स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने पंढरपूरचे तहसीलदार सुशील जी बेलेकर यांची भेट घेतली
शिवशाही वृतसेवा पंढरपूर
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने पंढरपूरचे तहसीलदार सुशील जी बेलेकर यांची भेट घेतली यावेळी प्रमुख दोन विषयांवर चर्चा केली
- श्री विठ्ठल कारखान्याचे थकीत ऊस बिल
- महावितरण वीजबिल वसुलीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे
वरील दोन विषयासंदर्भात आज प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांची भेट घेऊन चर्चा केली विठ्ठल कारखान्याच्या मागील हंगामातील उसाची बिले अजून थकीत आहेत सदर कारखान्यांवर आर आर सी ची कारवाई होऊन शेतकऱ्यांना ऊस बिल मिळणे अपेक्षित होते परंतु अद्यापि शेतकऱ्यांना ऊस बिल मिळाले नाही कोरोणा व त्यानंतर आलेल्या विविध नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे मागील वर्षीचे ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी धड वीजबिल भरू शकत नाही आणि कनेक्शन कट केल्यामुळे शेतातली पिके वाचू शकत नाही अशा दोन्ही बाजूने शेतकरी कचाट्यात सापडला आहे *त्यामुळे तातडीने कारखान्याची साखर जप्त करून शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तहसीलदार साहेबांनी विठ्ठल कारखान्याच्या आर आर सी च्या तीन नोटिसा झाले आहेत त्यामुळे मी वरिष्ठांची परवानगी घेऊन तात्काळ कारखान्याची साखर ताब्यात घेतो आणि शेतकऱ्यांची बिले लवकरात लवकर देऊ अशा प्रकारची भूमिका घेतली.
त्याच बरोबर पंढरपूर तालुक्यातील शेती पंपाच्या वीज बिल वसुली संदर्भात महावितरणने शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे चालू वर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी महावितरणला फुल ना फुलाची पाकळी म्हणून पंढरपूर तालुक्यातून कोट्यावधी रुपयाची वीज बिल भरलेले असताना परत एकदा अडचणीतल्या शेतकऱ्यांना तगादा लावण्याचं काम महावितरण करत आहे साधारण गेल्या एक महिन्यापासून शेती पंपाचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान होत आहे येत्या चार ते पाच दिवसात शेतीपंपाची वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तहसील कार्यालयामार्फत आमच्या पिकाची पंचनामे करावे आणि आम्हाला नुकसानभरपाई द्यावी.
अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली त्याच बरोबर उन्हाळ्यामध्ये भरलेल्या बिलांचा तीस टक्के परतावा शेतकऱ्यांना देऊ ट्रांसफार्मर जळल्यास अथवा मेंटेनन्स च्या खर्चाचे सर्व जबाबदारी महावितरण घेईल असे आश्वासन त्यावेळी महावितरणने दिले होते परंतु ते पाळले गेले नाही त्यामुळे महावितरणने वाढीव एचपी चे येणारे बिल, पावसाळा दुष्काळात आकारले जाणारे वीजबिल, प्रत्येक तीन महिन्याला आकारले जाणारे मोघम वीजबिल इत्यादी सह शेतकऱ्याच्या अनेक तक्रारी महावितरणबाबत आहेत या तक्रारीचे निराकरण करून महावितरण मोटारींना मीटर बसून यामध्ये पारदर्शकता आणावी त्यावेळेस शेतकरी पैसे भरेल अन्यथा महावितरण विरोधात आम्ही आरपारची लढाई करू.
सरकार जर आम्हाला वीज देत नसेल , पाणी देत नसेल, ग्रामीण भागात चांगल्या दर्जाचे रस्ते देत नसेल,शेतीमालाला दर देत नसेल आणि फक्त शेतकऱ्यांकडून कोरोना लाॅकडाउन आणि आर्थिक अडचणी चे कारण दाखवून अडचणीतल्या लोकांकडून पठाणी वसूल करत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल एवढाच एक पर्याय आमच्याकडे आहे व हे विषय वेळेत मार्गी न लागल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात येईल असे सांगितले.
यावेळी स्वाभिमानीचे सचिन पाटील शहाजहान शेख अजित बोरकर बाहुबली सावळे सचिन आटकळे आबा चव्हाण साहिल आतार योगेश शिंदे इत्यादी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा