maharashtra day, workers day, shivshahi news,

सहकार शिरोमणी साखरकारखान्याचे 1,21,121 व्या साखर पोत्याचे पुजन

सहकार क्षेत्राची निर्मिती शेतकऱ्यासाठी - रत्नागिरी जिल्हा म.स.बँकेचे चेअरमन तानाजीराव चोरगे यांचे प्रतिपादन

Shankar Shiromani sugar factory, chairman kalyanrao Kale, Pandharpur, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा भाळवणी 

ब्रिटीश काळातील खाजगी कारखान्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूकीस आळा घालण्यासाठी स्व्.यशवंतराव चव्हाण, स्व्.विठ्ठलराव विखे-पाटील, स्व्. वसंतदादा पाटील, स्व्.तात्यासाहेब कोरे, वसंतदादा काळे या थोर नेत्यांनी आपले सर्वस्व्.पणाला लावुन सहकाराची निर्मिती करुन गोर-गरिब शेतकऱ्यांना न्याय मिळवुन दिला.असे प्रतिपदान रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन तानाजी चोरगे यांनी केले. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 1,21,121 व्या साखर पोती पुजना प्रसंगी ते बोलत होते.

 सहकार चळवळीमुळेच महाराष्ट्राची प्रगती झाली असून, सहकार बँका, कारखाने, पतसंस्था, दुध डेअरी अशा अनेक सहकारी संस्थांची निर्मिती होवुन, चालन मिळालेली आहे. आज 40 कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. रत्नागिरी जिल्ह़यातील रायगड जि.म.स.बँक, सिंधुदुर्ग जि,म.स.बँक, आमची रत्नागिरी जिल्हा मध्यवती सहकारी बँक या सर्वच बँकेचे कामकाज सुरळीत चालत असून, नफ्यात आहेत. परंतु दुर्देवाने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक असल्याची खंत व्यक्त् केली. सहकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्येक बारीक सारीक होणाऱ्या गळतीवर लक्ष ठेवुन, ती थांबवावी, प्रामाणिकपणे काम करावे, आपला कारखाना असून कारखान्याची प्रगती झाली तर आपल्यासह आपल्या कुटुंबाचीही प्रगती होणार आहे. मागील दोन वर्षात दुष्काळ, कोरोना यामुळे अडचणीत असलेल्या या कारखान्यास उर्जीतावस्थेत आणण्याची जबाबदारी सर्व अधिकारी, कामगार, सभासदांची असल्याचे सांगुन कारखान्यास आमच्या बँकेचे सतत सहकार्य राहील असे सांगितले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी मागील 11 वर्षापासून श्री.चोरगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचे पारदर्शक कामकाज चालु असून बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे, त्यामुळे बँकेस अनेक पुरस्कारही प्राप्त् झाले असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांचा राजवाडा समजला जाणारा सहकार शिरोमणी साखर कारखान्याची 14 वर्षे वनवास भोगुन स्व्.दादांनी उभारणी केली. यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न्, परिसरातील तरुनांच्या बेकारीचा प्रश्न् मार्गी लागला आहे, मागील दोन वर्षातील दुष्काळ, व्याजाचा बोजा, साखर साठा, साखरेचा उठाव, साखरेची निर्धारीत किंमत, कोरोना या सर्व कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीत होता, मात्र राष्ट्राध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब, सहकार मंत्री जयंती पाटीलसाहेब, महाराष्ट्र राज्य् बँकेचे प्रशासकीय अधिकारी अनासकरसाहेब, रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक व धनश्री बँकेच्या आर्थिक सहकार्यामुळे अनेक अडचणीतुन मार्ग काढत आपण हा गळीत हंगाम सुरळीत सुरु आहे. स्व् दादांच्या पुण्याईमुळे रत्नागिरी बँकेने आपणास कर्ज उपलब्ध् करुन दिले असून, कारखान्यास उर्जीतावस्तेत आणण्याची जबाबदारी सर्व कामगारांची आहे, यासाठी सिझनमध्ये सर्वांनी उच्चांक गाळप करुन उपकाराची परतफेड करावी, पाळी संपण्याची वाट न पाहता आपला कारखाना समजुन दिवस-रात्र प्रामाणिकपणे काम करावे, आपल्या कारखान्याचे गळीताचे 5.50 लाखाचे उद्दिष्ट् पुर्ण करण्यास सांगुन, राष्ट्रवादी पंढरपूर महिला तालुकाध्यक्षा सौ.राजश्री ताड यांनीराज्य् सरकारच्या योजना तळागात पोहचविल्या बद्दल शुभेच्छा दिला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या 16 लाभधारक महिलांना चेअरमन कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी धनश्री परिवाराचे संस्थापक श्री.शिवाजीराव काळुंगेसर म्हणाले जगामध्ये उधारीने कोणीच काही देत नाही मात्र एकमेव शेतकरी हा कारखान्यास कच्चा माल ऊसाचा पुरवठा उधारीवर करीत असून, कारखान्यातुन उत्पादित होणारी प्रत्येक माल विकता येत आहे. संस्थेच्या भविष्यावर कामगारांचे भविष्य् असून सर्व कामगारांनी सहकार्याने काम करण्यास सांगितले. कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी मा.पाहुण्यांचा परिचय करुन उपस्थितांचे स्वागत केले तर आभार संचालक मोहन नागटिळक यांनी आभार मानले.

         

यावेळी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी सह.पतसंस्थेचे माजी चेअरमन महादेव देठे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, सिताराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणेश ठिगळे, निशिगंधा सह.बँकेचे मॅनेजर कैलास शिर्के, सहकार शिरोमणी कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंदे, माजी व्हाईस चेअरमन मारुती भोसले, संचालक सर्व श्री मोहन नागटिळक, गोरख जाधव, बाळासाहेब कौलगे, बिभीषन पवार, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, योगेश ताड, युवराज दगडे, इब्राहिम मुजावर, नागेश फाटे, मिस्टर संचालक अरुण बागल, माजी संचालक पांडुरंग कौलगे, शिवाजी जाधव, वाडीकुरोलीचे उपसरपंच राजेंद्र काळे, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, डेप्यु.जनरल मॅनेजर के.आर.कदम, फायनान्स् मॅनेजर रविंद्र घुले, चिफ अकौंटंट बबन सोनवले, टेक्निकल जनरल मॅनेजर प्रकाश तुपे, प्रोडक्श्न मॅनेजर एन.एम.कुंभार, मुख्य शेती अधिकारी अशोक गुळुमकर, डिस्टीलरी मॅनेजर पोपटराव घोगरे, को-जन मॅनेजर संभाजी डुबल, अधिकारी कर्मचार व ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !