ढाका विजयातील देशसेवेचा अभिमान – मेजर लामकाने
मेजर अंकुश लामकाणे यांचा सन्मान करताना ग्रा.पं.सदस्य पंडित देठे व पत्रकार |
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
अखंड देश, अखंड राष्ट्र, अखंड भारत हि भावना मनात बाळगून देशाला प्रेरणा देण्याचे काम सैनिक करीत असतात. देशसेवचे स्वप्न उराशी बाळगून मी घरच्या हलाखीच्या परस्थितीवर मात करून सैन्यात भरती झालो. प्रत्येक माजी सैनिकास आपण भारत मातेची सेवा केल्याचा अभिमान असतोच त्याप्रमाणे ढाका युध्दामध्ये देशसेवेसाठी सहभागी असल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन मेजर अंकुश लामकाने यांनी केले.
16 डिसेंबर 1971 रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान (ढाका) युद्धास 50 वर्ष पूर्ण झाली. भारताच्या विजयी दिनाचे औचित्य साधुन युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी असणारे तुंगत गावचे सुपुत्र कमांडो मेजर अंकुश लामकाने यांचा तुंगत ग्रामस्थ आणि पत्रकार यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मेजर अंकुश लामकाने यांनी युध्दातील आठवणी जागविल्या.
पुढे बोलताना लामकाने यांनी सांगीतले की, प्रत्येक युवकाने स्वःताच्या मेहनतीवर सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे यासाठी अंगी जिद्द आणि मनाची तयारी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रा.सदस्य पंडित देठे, औदुंबर गायकवाड, सुहास काळे, विजय गायकवाड, राज्य शाळा कृती समितीचे संघटक समाधान घाडगे, स्वप्निल रणदिवे, नागनाथ साळुंखे, तुंगत, पेनुर, मगरवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्यावतीने संतोष रणदिवे, विकास सरवळे, संजय रणदिवे, दादासाहेब कदम यांनी लामकाने यांचा शाल श्रीफळ आणि श्री. विठ्ठल - रुक्मिीणीची प्रतिमा देऊन सन्मान केला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा