पंढरपुरातील इंजिनियर तरुण-तरुणींचा मनसेने केला सन्मान
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर ( हुसेन मुलाणी )
पंढरपूर शहर व तालुक्यातील 48 इंजिनियर तरुण-तरुणींची विविध कंपन्यांमध्ये विविध पदावर निवड झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी त्यांचा सन्मान केला आहे ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसतानाही अनेक तरुण-तरुणींनी अत्यंत कष्टातून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे त्यानंतर त्यांची देशातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली आहे निवड झालेल्या सुमारे 48 तरुण-तरुणींचा मनसेच्या वतीने रविवारी येथील मनसेच्या कार्यालयात सन्मान करण्यात आला
यावेळी दिलीप धोत्रे म्हणाले की सध्या कोरोना आणि जागतिक मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे सध्या गुणात्मक शिक्षणाला महत्त्व आले आहे अशावेळी तरुणांनी संख्यात्मकते पेक्षा गुणात्मकते वर अधिक भर दिला पाहिजे तर त्यांचा मार्ग अधिक सुखकारक होईल गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आम्ही मदत करू असे आश्वासनही यावेळी दिलीप धोत्रे यांनी दिले यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ अभंगराव मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे कोळी महासंघाचे नेते अरुण कोळी समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल अभंगराव तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील शहराध्यक्ष संतोष कवडे अनिल बागल कृष्णा मासाळ नागेश इंगोले सतेज गांजाळे प्रताप भोसले अवधूत गडकरी आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व इंजिनीरिंग विद्यार्थी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा