श्री साईबाबा अंध महिला आश्रमात दिवाळीचा फराळ आणि अंध महिलांना साडी वाटप
शिवशाही वृत्तसेवा पुणे
सौ.सुशीलाबेन शहा ट्रस्ट तर्फे पुणे नांदेडफाटा सिहगड रोड येथील श्री साईबाबा अंध महिला आश्रमात सर्वाना दिवाळीचा फराळ आणि 30 अंध महिलांना साडी वाटप जेष्ठ समाजसेविका सौ .सुशीलबेन शहा आणि सौ.आशा ढोक व मोतीलाल शहा यांचे शुभहस्ते दि.29 ऑक्टोबर 21 रोजी सायंकाळी 6 वाजता केले. यावेळी जेष्ठसमाजसेवक, मोतीलाल शहा ,पोपटलाल सिघवी ,आश्रमपच्या व्यवस्थापक सोनल ब्राह्मणवाडीकर, नर्स मनिषा लोखंडे आणि फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक उपस्थित होते.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की राजकारणी मंडळी इलेक्शन आले की मतासाठी थोडीफार सेवा करतात पण मोतीलाल सारखे खरे समाजसेवक वर्षानुवर्षं सातत्याने वर्षभर मानवसेवा करीत आहेत त्यामुळेच आपल्या देशातील समतोल राखला जात आहे.मोतीलाल यांनी आता पर्यंत व्हीलचेअर,तीन चाकी सायकल जयपूर पुट चे वाटप करून हजारो दिव्यांगांना सातत्याने मदत करीत आहेत तसेच सामाजिक संस्था , गोशाळा यांना देखील दरवर्षी मदत करीत आहेत.त्यांची प्रेरणा घेऊन तरुणांनी सामाजिक सेवा करणे आधुनिक काळाची गरज असल्याचे देखील ढोक म्हणाले.
आश्रमाचे सोनल मंडम म्हणाले की या ठिकाणी देशभरातून गरजू अंध महिलांना मोफत प्रवेश दिला जात असून 80 महिलांनसाठी उत्तम सोय आहे.त्यांचे कडून कोणतीही फी घेतली जात नसून उलट त्यांनी बनविलेल्या वस्तू विक्रीतुन त्यांना पैसे दिले जातात.काही दानशूर पोपटलाल व मोतीलाल सारखे मदत करतात म्हणून संस्था चालू आहे .त्या पुढे असे देखील म्हणाले की वस्तू रूपाने मदत मिळते पण संस्थेचा इतर खर्च पहाता रोख देणगीदारा ची पण नितांत गरज आहे. तसेच सरकार व समाजकल्याण कडून बरेच वर्ष मदत मिळाली नाही, 42 अंध महिलांच्या साठी 12 कर्मचारी काम करतात त्यांना पगार व इतर खर्च देखील करणे खूप अवघड होतं आहे अशी खंत देखील व्यक्त केली.
त्यांनी पाहुण्यांना सर्व आश्रम दाखवून या अंध महिला त्यांचे त्यांचे कामे जीतल्या तिथे सुरेख करतात हा सुखद अनुभव सांगितला तर आश्रम ची सुंदर व्यवस्थापण पाहून व कोव्हिडं काळात या महिलांची योग्य काळजी घेतली म्हणून सर्व कर्मचारी बंधूंचे ढोक ,शहा यांनी अभिनंदन केले.शेवटी आभार सौ.आशा ढोक यांनी मानले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा