maharashtra day, workers day, shivshahi news,

आई वडिलांनी आम्हाला जी शिकवण दिली त्यामुळेच जेष्ठ मंडळी समाजसेवा करीत आहे - मोतीलाल शहा

 फुले एज्युकेशन तर्फे समाजसेवक पोपटलाल सिंघवी सन्मानीत

FULE EDUCATION socity, pune , social work, shivshahi news


शिवशाही वृत्तसेवा पुणे

फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे सिहगड रोड येथील बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रात दि.30 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 8 वाजता जेष्ठ समाजसेवक पोपटलाल सिंघवी यांचा गेली अनेक वर्षे करीत असलेल्या समाजसेवेबद्दल थोर समाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांची फोटो प्रेम,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ जेष्ठ समाजसेवक मोतीलाल आणि सौ.सुशीलबेन शहा यांचे शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मोतीलाल शहा म्हणाले की आमच्या आई वडिलांनी आम्हाला जी शिकवण दिली त्यामुळेच आम्ही जेष्ठ मंडळी समाजसेवा करीत आहे .आपल्या कडे जे आहे त्यातील थोडे फार खर्च करून समाजसेवा केली तर एक मानवसेवा केल्याचा आत्मिक समाधान मिळते. सत्कार सन्मान आम्हाला नको आहे पण पुढील पिढीला समाजसेवा केली पाहिजे तरच सामाजिक समतोल राखला जाईल यासाठी फुले एज्युकेशन पुढे येऊन आमच्या सारख्या जेष्ठ मंडळींना सन्मानित करते हाच उद्देश सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा असावा असे आम्हास वाटते.

पोपटलाल सिंघवी म्हणाले की आमचे सत्कार नको पण या आधुनिक काळात अंध ,अपंग, विकलांग जनसंख्या खूप मोठी असून त्यांच्या संस्थांना ,व्यक्तीला आजही मोठी गरज आहे म्हणून आम्ही वर्षभर जमेल तसे समाजसेवा करीत असतो पण सर्वच ठिकाणी वयोमानानुसार सर्व ठिकाणी आम्ही मदत करू शकत नाही ही खंत वाटते म्हणून तरुनपिढीने स्त्री पुरुष जात समजून मानवसेवा करावी असे आव्हान केले.आमच्या या कार्यात सातत्याने रघुनाथ ढोक नोकरी संभाळून मदतीला स्वतःची गाडी घेऊन धावून येतात त्यासाठी त्यांना कुटुंबातील मंडळी साथ देतात म्हणून आभरदेखील मानले.मोतीलाल यांनी फुले एज्युकेशन ला पाच हजारचा चेक भेट दिला.

यावेळी सत्यशोधक ढोक यांनी या केंद्रातर्फे आज पर्यंत 28 सत्यशोधक विवाह ,2 गृहप्रवेश व 4 प्रथम स्मृतीदिन कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने करून अंधश्रद्धा, कर्मकांड,मुहूर्त याला तिलांजली देऊन अनेक जिल्ह्यातील गावात व तेलंगणा राज्यात प्रथम सत्यशोधक कार्य आमचे संस्थेने सन्मानपूर्वकसुरू केल्याचे देखील यावेळी सांगितले.

यावेळी जेष्ठ समाजसेविका सौ.सुशीलबेन वय 85 आणि मोतीलाल शहा वय 86 यांचे शुभहस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर आशा ढोक यांनी सत्याचा अखंडाचे गायन केले व क्षितिज ढोक यांनी आभार मानले

yaman films, wedding photography, pre-wedding, cinematography


-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !