शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनुराधा अशोक कुलकर्णी यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार करण्यात आला. पंढरपुरातील मोरारजी कानजी धर्मशाळेच्या सुंदर सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी सुलभाताई वठारे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके हे अध्यक्षस्थानी होते. त्याबरोबर पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, मंगळवेढ्याचे गटशिक्षणाधिकारी पि.के. लवटे, माजी गटशिक्षणाधिकारी कोष्टी साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी लिगाडे साहेब, नकाते साहेब, रणदिवे साहेब, आदी मान्यवर अधिकारी व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब काळे, तालुका अध्यक्ष रामभाऊ यादव, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष जमदाडे, तसेच प्राथमिक शिक्षक समितीचे नेते सचिन लादे, कल्याण शिंदे, आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
प्रथम नवनाथ मोरे यांनी सुरेल आवाजात ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर संयोजकांच्या वतीने निमंत्रित मान्यवरांचे स्वागत पर सत्कार संपन्न झाले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी सुलभाताई वठारे, यांनी सत्कारमूर्ती मुख्याध्यापिका सौ.अनुराधा अशोक कुलकर्णी, यांचा सेवापुर्ती निमित्त शाल, श्रीफळ, पुष्पहार, व पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करून, सेवा निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी कुलकर्णी दंपत्याची जेष्ठ कन्या, सौ. कीर्ती ज्ञानेश कुलकर्णी, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, आई मधील शिक्षिका, आणि शिक्षिके मधील आई, कशी असते हे सांगितले. सेवानिवृत्त शिक्षिका सौ. अनुराधा कुलकर्णी यांचे नातेवाईक, शेजारी, हितचिंतक, यांनी आपल्या मनोगतातून त्यांना शुभेच्छा दिल्या. मंचावरील अधिकारी, व विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, "सौ.अनुराधा अशोक कुलकर्णी या एक उत्तम आणि विद्यार्थी प्रिय तळमळीच्या शिक्षिका होत्या" असे गौरवोद्गार काढले.
या बहारदार सोहळ्याचे सूत्रसंचालन संध्या काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक कुलकर्णी व शांताराम गाजरे यांनी केले. कार्यक्रमानंतर आयोजित प्रीती भोजनाची उपस्थितांनी मनसोक्त प्रशंसा केली.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
काकू शुभेच्छा
ReplyDelete