भाजपाच्या वतीने देण्यात आले तहसीलदारांना निवेदन
रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन तहसीलदारांना देताना भाजपा कार्यकर्ते |
प्रतिनिधी पंढरपुर
पंढरपूर ते सांगोला या रस्त्याच्या च काँक्रीटकरणाचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मात्र पंढरपूर तालुक्यातील कासेगाव नजिक वनविभागाच्या हद्दीतून हा रस्ता जात असल्याने या ठिकाणा रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता अतिशय धोकादायक ठरला असून वाहनाच्या वर्दळीमुळे प्रचंड धुळीचे लोट निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येते. तर वेगाने येते. तर वेगाने आलेली वाहने आकस्मात कच्चा रस्ता लागल्याने धोकादायक रित्या वाहनांचा वेग कमी करत असताना अपघाताच्या घटना होत आहेत.
सदर अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम वन विभाग व आपल्या विभागाच्या अनास्थेमुळे प्रलंबित राहील्याने नागरिकांना जिवीतास धोका उत्पन्न झाला आहे. तरी आपण तातडीने या बाबत उपाय योजना करावी व या रस्त्याचे काम हाती घ्यावे अन्यथा रविवार दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.00 वाजता पंढरपूर कासेगाव रोडवर वनविभागाच्या हद्दीतून जात असलेल्या रोड या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी प्रणव परिचारक, माऊली हळणवर, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, रामदास ढोणे, लाला पानकर, सुनिल भोसले, भाऊ टमटम, नितीन कारंडे, विक्रम शिरसट, तसेच त्याभागातील प्रशांत देशमुख, संग्राम देशमुख, बाळासाहेब शेख, हरी गावंधरे, हरी फुगारे, दादा मोटे, संतोष देशमुख, महादेव लवटे, शरद रोंगे, रमेश हाके, अरूण घोडके, पप्पु यादव पुरषोत्तम पवार इ. उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा