केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात पंढरपूरात काँग्रेसचे आंदोलन - जोरदार घोषणाबाजी

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात पंढरपूरात काँग्रेसचे आंदोलन - जोरदार घोषणाबाजी

Congress agitation against Modi government,  Pandharpur , shivshahi news

पंढरपूर - प्रतिनिधी

एकीकडे दररोज वाढत जाणारे इंधनाचे भाव, गॅस सिलेंडरच्या किंमतीत होणारी वाढ, अन्नधान्य तसेच जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत असून भाव गगनाला भिडले आहेत. मात्र अन्नधान्य पिकवणारे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. केंद्रातील मोदी सरकार यावर काहीच पर्यायी व्यवस्था करत नाही. 
त्यामुळे इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ कमी करावी, आणि शेतमालाला हमीभाव द्यावा, तसेच तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या आणि इतर मागण्यांसाठी पंढरपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.तसेच वरील मागण्यांचे निवेदन  तहसीलदारांना देण्यात आले.

Congress agitation against Modi government,  Pandharpur , shivshahi news

यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटनीस हनुमंत मोरे, शहराध्यक्ष  राजेश भादुले,युवक शहर कार्याध्यक्ष सागर कदम, युवक जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, ओबीसी जिल्हाध्यक्ष समीर कोळी, जनसेवेचे राहुल पाटील, अल्पसंख्यांक आश्पाकभाई सय्यद, मिलिंद आढवळकर,सुहास भाळवनकर, नागेश गंगेकर,महीला तालुकाध्यक्ष राजश्री ताई लोळगे, अक्षय शेळके दीपक पिंजारे, किरण जाधव महाराज, नागनाथ अधटराव, प्रताप रजपुत, देवानंद ईलकर, कृष्णा कवडे, मधुकर फलटणकर, अजय गंगेकर,अभिषेक शहा,अमित अवघडे व इतर कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !