स्वातंत्र्याच्या उत्सवात विठुराया सहभागी
75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तिरंगी फुलांची सजावट
पंढरपूर - दिनांक 15 (प्रतिनिधी)
आपण देशाचा 75 स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या सुवर्ण क्षणांचा संपूर्ण देशवासीयांना अभिमान आहेत त्याच बरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांनीही हा आनंद द्विगुणित केला आहे मंदिर समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून सण-उत्सव आणि काही विशेष दिवसांचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फळा फुलांची सजावट करण्याची परंपरा सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची सजावट केली आहे पुण्याच्या श्रीमंत मोरया प्रतिष्ठान यांनी ही सजावट श्री विठ्ठलाला अर्पण केली असून विविध प्रकारची सातशे किलो फुले वापरून पंढरपूरच्या साई डेकोरेटर्स च्या शिंदे बंधूंनी ही पुष्परचना केली आहे . राष्ट्रध्वज यासारखी तिरंगी रंगसंगती वापरून केलेल्या या पुष्प रचनेमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आला आणि गाभाऱ्याला मनमोहक स्वरूप प्राप्त झाले असून भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या आनंदात भक्तांचा लाडका विठुराया सुद्धा सहभागी झाला असल्याचे भासत आहे
आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हिडिओ पहा -
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा