maharashtra day, workers day, shivshahi news,

आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावरील दगडफेकीचा पंढरपुरात निषेध

ओबीसी समाजाकडून उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन

Gopichand padalkar, Solapur, Pandharpur, NCP, BJP, shivshahi news
निषेध करताना विविध समाजातील मान्यव


 

 बहुजन चळवळीचा उगवता तारा, आमदार गोपीचंद पडळकर, यांच्या वाहनावर सोलापूर येथील घोंगडे वस्ती येथील बैठकीवेळी, करण्यात आलेल्या हल्ल्याचा आज पंढरपुरात विविध ओबीसी समाज बांधवांकडून निषेध करण्यात आला. या  हल्ल्यातील आरोपी अमित सुरवसे, याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन, या तरुणास हल्ला करण्यास प्रवृत्त करणार्‍या व्यक्तींचा शोध घेवून, त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना देण्यात आले.     

राज्यभरात ओबीसी समाजांचे राजकिय आरक्षण रद्द झाल्यामुळे, संतापाचे वातावरण आहे. राज्यातील ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी, विधान परिषदेचे आमदार मा.गोपीचंद पडळकर यांनी राज्यव्यापी ओबीसी समजांच्या घोंगडी बैठकांचे आयोजन केले आहे. व या बैठकांना राज्यातील ओबीसी समजाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसमधील काही दहशतवादी प्रवृत्तींकडून आ. गोपीचंद पडळकर यांच्या जिवाला धोका उत्पन्न झाला आहे. 

सदर प्रकरणातील आरोपी अमित सुववसे हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा कार्यकर्ता असून आ. पडळकर यांचा जिव घेण्याचाच सदर आरोपीचा प्रयत्न होता हे दिसून येते. तरी सदर प्रकरणाचा सखोल तपास करुन या कटात सहभागी झालेल्या सर्वांवर, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.   यावेळी अंबादास धोत्रे, अरुण बनसोडे, राजू बनसोडे, बाबा चव्हाण, बबन येळे, प्रसाद कोळेकर, हनुमंत शेंडगे, धनाजी रुपनर, शिवाजी अलंकार, नगरसेवक प्रकाश रुपनर, गणेश अंकुशराव, कृष्णा वाघमारे, माजी नगरसेवक गुंड, संतोष निर्मळे, तसेच विविध जमातीचे प्रमुख उपस्थित होते 


  इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !