राजर्षी शाहू छत्रपतींची जयंती निमित्त जिलेबी वाटप
![]() |
राजर्षी शाहू छत्रपतींची जयंती उत्सहात साजरी ! |
पंढरपूर - प्रतिनिधी
राजर्षी शाहू छत्रपती यांची जयंती पंढरपूर येथील "राजर्षी शाहू काॅर्नर" येथे सर्व बहुजन समाज संघटनाच्या व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितीत राहून महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले . राजर्षी शाहू छत्रपतींचे पंढरपूर तालुक्यातील बहुजन समाजावर असणार्या उपकाराची जाणिव करुन दिली व या उपकारातून उतराई होण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा पंढरपूरात उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर चे अमरजीत पाटील, शहराध्यक्ष लखनराज थिटे, अँड.अखिलेश वेळापुरे, वंचित बहूजन आघाडीचे माजी राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे, साप्ता.जोशाबा टाईम्स् चे संपादक श्रीकांत कसबे, काॅंग्रेस आय पक्षाचे शंकर सुरवसे, आर पी आयचे माजी शहराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक सुनिल डोंबे, बारा बलूते संघटनेचे किशोर भोसले, माजी नगरसेवक रमेश कांबळे, अनिल पलसांडे संभाजी ब्रिगेडचे प.महाराष्ट्र अध्यक्ष किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, मिलिंद भोसले, मच्छिंद्र सावंत सर, पिंटू भोसले, किशोर बिचुकले, दिपक पालसांडे, विरेंद्र कांबळे, आदीनाथ शिंदे, संजय आशोक घोडके, नितीन पालसांडे, अभिजीत पालसांडे, सनी पालसांडे, पप्पू उळागड्डे, यांच्यासह बहुजन समाजातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते. याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त उपस्थितींना जिलेबीचे वाटप करुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला. कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर चे संस्थापक अमरजित पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा