बंदिस्त प्रचारास पन्नास जणांना परवानगी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
निवडणुकीचा प्रचार नियमांच्या कचाट्यात - खुल्या जागेवर 200
सोलापूर - ( प्रतिनिधी ) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार कोरोना निर्बंधाच्या कचाट्यात अडकला आहे.या अनुषंगाने मतदार संघात सभेसाठी आणि प्रचारासाठी जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये बंदिस्त ठिकाणी राजकीय मेळाव्यास 50 व्यक्ती , तर खुल्या जागेवर 200 किंवा एकूण क्षमतेच्या 50% यापैकी कमी असेल तेवढ्याच लोकांना परवानगी दिली आहे .
कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित शारीरिक अंतर , मास्क व तापमान मोजमाप करणारे यंत्र , सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे . मंगळवेढा - पंढरपुर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सभेसाठी नियमांचे बंधने घालून परवानगी देण्यात आली आहे . जिल्ह्यात इतरत्र सभा , मोर्चा , मिरवणुका , संमेलने , यात्रा , मेळावा , कार्यक्रम घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे .जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत नुकतेच आदेश जारी केले आहेत . 15 एप्रिल पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे .त्यानुसार जिल्ह्यात सायंकाळी आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे . या कालावधीत मॉल्स , सभागृहे आणि रेस्टॉरंट बंद राहतील .या आदेशाचे उल्लंघन झाल्यास हॉटेल्स , रेस्टॉरंट ही बंद करण्यात येतील तसेच त्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक
निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमाणापेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे रॅली , कॉर्नर सभा , जाहीर सभा आणि मेळाव्यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे .
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा