उपमहापौरांवर कारवाईसाठी पुरवणी प्रस्ताव
महापालिकेच्या उद्याच्या सर्वसाधारण सभेत निर्णयाची शक्यता. ; सर्व पक्षांचे मत महत्त्वाचे
![]() |
rajesh kale |
सोलापूर - ( प्रतिनिधी ) महापालिकेतील भाजपचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांच्यावर अधिकाऱ्यांना शिवीगाळ व खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या विषयास अनुसरून शासनास माहिती देण्याबाबत चा विषय २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर होता. पण याच सभेच्या पुरवणी विषयक पत्रिकेत उपमहापौर काळेंवर पदावरून दूर करण्याबाबतच्या कारवाईचा विषय आयुक्ताच्या मान्यतेने आला असून या विषयावर सभेत सर्वपक्षीय काय निर्णय होणार ?, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
उपमहापौरांसंदर्भात पुरवणी विषय पत्रिकेत आलेल्या विषयात असे नमूद केले आहे की , उपमहापौर यांच्यासह दाखल गुन्हा व त्याच अनुषंगाने दिलेली नोटीस व प्राप्त खुलासा यावर निर्णय घेण्यात यावा , यासाठी पुन:श्च मान्यता मिळावी , अशा प्रस्तावित प्रमाणे उपायुक्तांच्या १३ फेब्रुवारी चा टिपणी मध्ये कलम 13 मध्ये सविस्तर नमूद आहे. अधिनियमातील तरतुदी सविस्तरपणे नमूद करून त्यानुसार पालिका सदस्य म्हणून त्यांची कर्तव्य बजावत पदावर असताना कोणत्याही गैरवर्तणूक की बद्दल किंवा अशोभनीय वर्तणुकीबद्दल दोषी ठरला असेल तर राज्य शासनास , स्वतःहून किंवा महानगरपालिकेच्या शिफारशीवरून त्या सदस्यास पदावरून दूर करता येईल , असे नमूद केले आहे. प्रास्तावितप्रमाणेमान्यता मिळवण्यासाठी आयुक्तांनी हा विषय कायदेशीर कारवाईसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठवा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार हा विषय पुरवणी विषय पत्रिकेत आला आहे.
नळाला मीटर बसवून पाणी पुरवठा
सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाच्या बजेट निमित्त झालेल्या बैठकीत शहर हद्दवाढ मधील सर्व नळजोडण्यांना मीटर बसवून पाणीपट्टी वसुली करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीस आयुक्तांसह सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने मीटर पुरविणे ,बसवणे आणि पाच - दहा वर्ष देखभाल व दुरुस्तीची तरतूद व कार्यवाहीचा विषय सभेसमोर आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा