भालके यांचे कार्य पुढे नेण्यासाठी ' भगीरथ ' च्या पाठीशी राहा - बाळासाहेब पाटील
मंगळवेढ्यात जनसंवाद यात्रेला प्रारंभ जिल्ह्यातील अनेक नेत्यांची हजेरी
![]() |
भगीरथ भालके |
मंगळवेढा - ( प्रतिनिधी ) मतदार संघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम सहकार्य करणार आहे. पण गोरगरीब लोकांच्या प्रश्नांसाठी तळमळीचे कार्य करणारे आमचे सहकारी आ . भारत भालके यांचे कार्य पुढे नेण्यासाठी भगीरथ भालके यांच्या पाठीशी ठाम राहा , असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
मंगळवेढ्यात दिवंगत .आ. भारत भालके यांच्या जयंती निमित्त जनसंवाद यात्रेचा प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. राजन पाटील ,आ. प्रणिती शिंदे , आ. संजय मामा शिंदे , बळीराम साठे , उत्तमराव जानकर , प्रकाश पाटील , उमेश पाटील , दत्ता मस्के , राहुल शहा , पी. बी. पाटील , लतीफ तांबोळी , नंदकुमार पवार , भारत बेदरे , मुजम्मिल काझी , अरुणा माळी , अनिता नागणे , संगीता कट्टे , अजित जगताप , चंद्रकांत घुले , दिलीप जाधव , यांच्यासह महा विकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते.
![]() |
baalasaheb patil |
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन पाटील यांनी भगीरथ हे सक्षम आहेत. त्यांचा संघर्षाचा वारसा आहे. ते नक्की आमदार होतील. त्यांच्या सत्काराला मी येणार आहे , असे प्रणिती शिंदे यांनी एक बहीण म्हणून भगीरथ दादा यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे असून मतदार संघातील जनतेला भालके नानांवर जसे प्रेम केले. तसेच प्रेम भगीरथ दादांवर करा , असे आव्हान त्यांनी केले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यात्रेला संबोधित करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देत असताना भगीरथ भालके यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी द्यावी. अन्यथा इतरांना उमेदवारी दिल्यास त्या उमेदवाराचा पराभव निश्चित होणार आहे , हे लक्षात घ्यावे , असा इशारा आपल्या भाषणातून दिला.मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाजच्यावतीनेधनगर समाजाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी भगीरथ भालके यांना पाठिंबा जाहीर केला.स्व . आ. भारत भालके यांना तीन टर्म तालुक्यातील धनगर समाजाने मोठी ताकद दिली आहे. तीच आता भगीरथ त्यांच्या पाठीशी देत असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी बळीराम साठे , उत्तमराव जानकर , उमेश पाटील , दत्ता म्हस्के , नारायण घुले , शिवानंद पाटील , यशवंत खताळ , यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पांडुरंग चौगुले यांनी , सूत्रसंचालन भारत मुंडे यांनी केले, तर आभार संभाजी गावकरे यांनी मानले.
भगीरथ भालके यांच्यात भारत भालके यांची झलक
भारत भालके यांची प्रश्न मांडण्याची ,मुद्देसूद भाषण करण्याची तसेच आवाजाची झलक भगीरथ भालके यांच्यात दिसत असल्याचे सभेला उपस्थित लोकातून बोलले जात होते. भगीरथ भालके यांनी लोकांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही .मात्र ,यात्रा सुरू करत आपल्या चा उद्देश सांगितला.भारत नानांनी आमदारकीच्या काळात पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी केलेला संघर्ष सांगत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदत्वाचा अक्रियाशील मुद्द्यावरून होत असलेल्या राजकारणाची जाणीव करून दिली. तसेच सर्व सभासदांचा हक्क अबाधित राहावा , याबाबत आपण मदत करावी , असे आव्हान केले. मंगळवेढा तालुक्यात संत बसवेश्वर , संत चोखामेळा , कान्होपात्रा यांचे तीर्थक्षेत्र पर्यटन विकसित व्हावे, यासाठी महा विकास आघाडीच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा