लग्नाच्या नावाखाली विवाह संस्थेकडून तरुणांची फसवणूक
पोलिसात गुन्हा दाखल, सत्तर तरुणांना घातला गंडा
![]() |
matrimonial fraud |
पंढरपूर- (प्रतिनिधी) आजकाल मुलांच्या प्रमाणात मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत आहे. यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. यामुळे लग्नाचे वय होऊन देखील लग्न जुळत नसल्याने अनेक तरुण नाईलाजाने विवाह संस्था अथवा वधू - वर सूचक मंडळाकडे धाव घेतात आणि त्यांच्या आमिषाला बळी पडतात. सुंदर मुलींचे फोटो दाखवून सुमारे सहा लाख 66 हजार रुपयांना एका विवाहेच्छुक तरुणाला गंडा घातला आहे. याबाबत तुंगत येथील तरुणांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विवाह संस्थेत नाव नोंदवल्याने मनासारखे स्थळ मिळेल, अशी आशा अनेक तरुणांना असते. अनेक चांगल्या संस्था या तरुणांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवता तही.पण काही संस्था कडून विवाहेच्छुकांना दगाफटका झाल्याचेही अधूनमधून कानावर येत मुंबई येथील'नवरी मिळे नवऱ्याला'या संस्थेने ही सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पंढरपूर तालुक्यातील तरुणांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवरी ही गेली आणि पैसेही गेले, अशी अवस्था या तरुणांची झाली आहे. मुंबईतील नवरी मिळे नवऱ्याला, या विवाह संस्थेत तुंगत (ता. पंढरपूर) येथील शहाजी शिंदे यांनी नोंदणी केली होती. संस्थेतील युवकांनी शहाजी शिंदे यांच्याशी सोशल मीडियाद्वारे ओळख निर्माण केली होती. त्यानंतर लग्न साठी तयार असलेल्या मुलींचे फोटो दाखवले आणि त्या मुलींचे मोबाईल नंबर देऊन त्यांच्याशी बोलणी करून दिले. मुलींचा फोन मिळाल्याने शहाजी शिंदे यांनाही मुलीशी बोलणे सुरू केले. या दरम्यान,शहाजी शिंदे यांनी लग्नाच्या तारखे बाबत विचारले असता आणखी पैशाची मागणी करण्यात आली.
लग्नासाठी लागणारे साहित्य, कपडे, सोने आदी साठी पैशाची मागणी केली. त्यामुळे शहाजी शिंदे यांनी सहा लाख 66 हजार रुपये वेळोवेळी मुलीच्या नावावर फोन पे करून ट्रान्सफर केले. मात्र, लग्नाबाबत संस्था तारीख देत नसल्याने शिंदे या विवाहेच्छुक तरुणाला संशय आला. त्याने लग्नाबाबत विचारले असता विवाह संस्थेचे फोन बंद झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शहाजी शिंदे यांनी पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा