स्वेरीचा टलास काॅपको सोबत सामंजस्य करार
पंढरपूर- (प्रतिनिधी) गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रीसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे पुण्यातील 'टलास काॅपको' बरोबर नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर बी.पी. रोंगे यांनी दिली.
या सामंजस्य करारावर' टलास काॅपको' कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक कबीर गायकवाड व महाविद्यालयातर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य डॉक्टर बी.पी .रोंगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.'टलास काॅपको' बरोबर झालेल्या सामंजस्य करारामुळे स्वेरीमधील संशोधक व प्राध्यापक यांना इंडस्ट्रियल टूल आणि इक्यूपमेंट मेन्यूफॅक्टचरिंग तसेच नवीन क्षेत्रामध्ये त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त झाली. हा करार पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत पवार, संशोधक अधिष्ठाता डॉक्टर संतोष साळुंखे व प्राध्यापक अविनाश मोटे यांनी परिश्रम घेतले.
----------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा