"ईडी चा गैरवापर काँग्रेसच्या काळात "
फडणवीस यांचा पलटवार
मुंबई-(प्रतिनिधी) ईडी'सारख्या संस्थांचा गैरवापर काँग्रेसच्या काळातच झाला होता. भाजपच्या काळात असा कोणताही गैरवापर होत नाही. ज्याच्या विरुद्ध तक्रारी किंवा पुरावे आहेत त्याच्यावरच कारवाई होत आहे, असा पलटवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणीईडी'ने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे. त्यावरून संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या टीकेला भाजपच्या नेत्यांनीही प्रतिउत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ईडी'सारख्या संस्थांच्या गैरवापर काँग्रेसच्या काळात झाला. या काळात हा गैरवापर होत नाही. ज्याच्याबद्दल तक्रारी असतील किंवा काही पुरावे असतील त्या संदर्भातच चौकशी होते. आपण जर काही केले नसेल, असे सांगत त्यांनी राऊत यांना चौकशीला सामोरे जाण्याचा सल्ला दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनींही संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेतला. काहीही घडेल तरी भाजपवर टीका केली जाते.राऊत आणि विरोधकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना मान्य नसावी. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत बद्दल बोलताना भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण नाहीतर हवाबाण आहे. केवळ तोंडाच्या वाफा दवडू नका, पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला, असा हल्ला भातखळकर यांनी चढविला. भाजपावर हेत्वारोप करण्याचे धंदे व उद्योग बंद करा. कंपाऊंडर कडून औषध घेताय आता एम डी डॉक्टर कडून घ्या, म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठीक होईल, असा टोला भातखळकर यांनी लगावला. आपल्या दमडीचा हिशोब संजय राऊत यांनी ईडीला द्यावा. दमबाजी करू नये आणि भाजप दमबाजी ला घाबरत नाही, असे भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले. कंगना राणावत याचे घर तोडताना मर्दानगी होती का? कंगना राणावत यांना मुंबईमध्ये येऊ देणार नाही,त्यांचं तोंड फोडू असे बोलताना शिवसेना ला मर्दांगी आठवली नाही का? असा सवाल करताना शिवसेनेने आधी स्वतःकडे बघावे. स्वतःच्या पायाखालची जमीन घसरली आहे. कर नाही तर डर कशाला? डर आहे म्हणूनच राऊत डराव डराव करत आहेत, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी केली.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा