सांगोल्यातून धावली 100 वी किसान रेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
![]() |
P.M. Narendra Modi |
सांगोला - (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगाल मधील शालिमार अशी शंभरावी किसान रेल सांगोला येथून धावली. ही किसान रेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या शेतमालाला देशभरातून बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी किसान रेल ही विशेष गाडी भारतीय रेल्वे विभागाने सुरू केली आहे. आजवर विविध राज्यातून किसान रेल्वेच्या 99 फेऱ्या झाल्या आहेत. किसान रेल्वेची शतकी फेरी महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगाल मधील शालिमार अशी धावली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठे पाऊल उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात किसान रेलची संकल्पना सुरू केली. या विशेष गाडीमुळे शेतकऱ्यांना आपली कृषी उत्पादने देशाच्या एका भागातून दुसर्या भागात अतिशय अल्प दरात पोहोचवणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल तसेच देशाच्या विविध भागातील ग्राहकांनाही इतर भागातील शेती उत्पादने सहजतेने उपलब्ध होतील. 14 राज्यातून प्रवास करणारी ही किसान रेल डाळिंब द्राक्षे बोरे चिकू पेरू यासारखी फळे व कोबी फुलकोबी टोमॅटो सिमला मिरची यासारख्या भाज्या आदी शेतमाल देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात स्वस्त दरात आणि अल्प वेळेत पोहोचवणार आहे. किसान रेल साठी रेल्वेने शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात 50 टक्के सवलत दिल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही कमी होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या किसान रेलचे उत्साहात स्वागत केले आहे.
![]() |
kisan rail |
शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल व्हावे यासाठी सुरू केलेल्या किसान रॅलीमध्ये शेतकऱ्यांना माल पाठवण्यासाठी कोणतीही किमान मर्यादा ठेवलेली नाही. त्यामुळे छोट्या उत्पादकांनाही या किसान रेल्वेचा लाभ घेता येणार आहे. अगदी तीन किलो डाळिंब सुद्धा किंवा सतरा डझन अंडी अशा छोट्या स्वरूपात सुद्धा या किसान फिल्म मधून उत्पादक आपला माल पाठवू शकतात. किमान मालाची अट नसल्यामुळे कोणतेही शेतकरी किसान कालचा लाभ घेऊ शकतात आणि स्थानिक बाजारपेठेबरोबरच देशभरातील बाजारात आपला माल विकू शकतील.
बाजार भावाअभावी आता माल खराब होणार नाही
बऱ्याचदा कांदा टोमॅटो यासारखे उत्पादने जेव्हा बाजारात मोठ्या प्रमाणात येतात तेव्हा त्याचे भाव पडतात अशावेळी शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल खराब होऊन जातो किंवा मिळेल त्या भावात विकावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना कधीकधी उत्पादन खर्च पेक्षाही कमी भाव मिळतो परंतु आता किसान रेलमुळे शेतकरी स्थानिक बाजारपेठेत भाव कमी असेल तर आपली उत्पादने अशा ठिकाणच्या बाजारपेठेत पाठवू शकतील जिथे त्या मालाला अधिक मागणी आणि किंमत असेल.
किसान रेल म्हणजे फिरते कोल्डस्टोरेज आहे
दूध, मासे, अंडी, मांस, फळे, आणि भाज्या अशा प्रकारचा माल सडक मार्गाने दूरच्या बाजारपेठेत पाठवणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत नाही तसेच अधिक वेळ लागत असल्याने हामाल रस्त्यात खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना आणि उत्पादकांना अशा प्रकारचा माल स्थानिक बाजारपेठेतच विकावा लागत होता
परंतु किसान रेल हे एक चालते फिरते कोल्ड स्टोरेज असल्याने तसेच कमी वेळेत माल दूरपर्यंत पोहोचत असल्याने त्याबरोबरच वाहतूक खर्चही अगदी कमी लागत असल्याने आता उत्पादक शेतकऱ्यांना अशा प्रकारचा लवकर खराब होणारा मालही देशभरातील बाजारपेठेत विकता येणार आहे. किसान रेल कोल्ड स्टोरेज सारखी रेफ्रिजरेटर कंटेनर यंत्रणा असल्यामुळे शेतमाल खराब होणार नाही आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही
![]() |
nirmala sitaraman |
अर्थमंत्र्यांनी बजेट मध्येच केली होती किसान रेलची घोषणा
चालू वर्षी एक फेब्रुवारीला बजेट मध्येच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान रेलची घोषणा केली होती. लवकर खराब होणार्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटर कंटेनर असणारी किसान रेल शेतकऱ्यांसाठी अल्प दरात उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी बजेट वेळी सांगितले होते. या रेल साठी बजेटमध्ये निधीही उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार सात ऑगस्ट रोजी पहिली किसान रेल चालवली गेली होती. कोरोना कालावधीमध्ये ऑगस्टपासून डिसेंबर पर्यंत देशाच्या विविध राज्यातून 99 किसान रेलच्या फेऱ्या चालवल्या गेल्या आणि शंभरावी फेरी महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगाल मधील शालिमार अशी दिनांक 28 डिसेंबर रोजी धावली
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा