कवी कालिदास मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
बार्शी - (प्रतिनिधी) साहित्य विश्वात बहुमोल असं योगदान देणाऱ्या, बार्शीतील कवी कालिदास मंडळाच्या, नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आनंदमय वातावरणात संपन्न झाला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, मा. जयकुमार शितोळे (बापू) यांच्या हस्ते, तर मावळते अध्यक्ष, प्रा. डॉ. रविराज फुरडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन अध्यक्ष कविवर्य रामचंद्र इकारे, उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, सचिव चन्नबसवेश्वर ढवण आदींचा सत्कार मंडळाच्यावतीने करण्यात आला या समारंभाचे आयोजन माजी सचिव गंगाधर अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन सुमन चंद्रशेखर यांनी, तर आभार प्रदर्शन मुकुंदराज कुलकर्णी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे, शब्बीर मुलाणी, दत्ता गोसावी, प्रा. अशोक वाघमारे आदि उपस्थित होते.
![]() |
कवी कालिदास मंडळ- नवीन पदाधिकारी सत्कार |
यावेळी, "समाजाला दिशा देण्याची जबाबदारी ही साहित्यिकांची असते आणि कवी कालिदास मंडळ गेली कित्येक वर्षे ती पार पाडत आहे", असे गौरवोद्गार, जयकुमार शितोळे यांनी व्यक्त केले. नूतन अध्यक्ष रामचंद्र इकारे, यांनी विविध साहित्यिक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी डॉ. रविराज फुरडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. जयसिंग राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा