स्व .आ. भारत भालके हे पंढरपूर - मंगळवेढा मतदार
संघातील विकासकामांसाठी चिकाटीने पाठपुरावा
करीत होते - खा . शरद पवार
चंद्रभागा कारखान्याला गतवैभव मिळवून देणार , आगामी निवडणुकीत माझे या भागावर पूर्ण लक्ष - खा . शरद पवार यांचे प्रतिपादन
पंढरपूर - (बातमीदार ) स्व .आ भारत भालके हे पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील विकासकामांसाठी चिकाटीने पाठपुरावा करीत होते . मंगळवेढयातील ३५ गावांच्या पाणीप्रश्नासाठी आजारी असतानाही भारत भालके यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, थोड्या दिवसात मी परत येणार आहे. सर्वाना सोबत घेऊन चंद्रभागा कारखान्याला गतवैभव आणू ,असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिले.
आ. भारत भालके यांच्या निधनामुळे सरकोली (ता . पंढरपूर ) येथील भगीरथ भालके व कुटूंबियांची आज सकाळी त्यांनी भेट घेत सांत्वन केले. यानंतर शोक सभेत ते बोलत होते.
![]() |
स्व .आ भारत भालके यांच्या कुटूबींच्या सांत्वन करताना खा. शरद पवार .याप्रसंगी भगीरथ भालके व उपस्थित मान्यवर. |
भारत भालके आजारी असताना मी दररोज माहिती घेत होतो. मुंबई -दिल्ली येथील तज्ञ् आरोग्य तज्ञांकडे घेऊन जाण्याचा विचार केला. त्यांनी भारत भालके यांच्या आजाराचा अहवाल मागितला. मात्र पुणे येथील डॉक्ट्रांनी भारत भालके यांना हलवणे योग्य नसल्याचा अहवाल दिला. भारत भालके आत्ता आपल्यात राहिले नाहीत. मात्र त्यांचे कर्तृत्व , त्यांची माणुसकीची भावना आणि या भागाच्या विकासासाठी केलेल्या अविरत ध्यास याचा विसर आपल्याला कधी पडणार नाही. या भागात सहकारी संस्था, कारखानदारी आहे. हि वाचली पाहिजे. या भागाचा कायम विकासाचा ध्यास भारत भालके यांनी घेतला होता. त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न आपण सर्व एकत्रित येत पूर्ण करूयात. भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चिकाटी ठेवली होती. आजारपणातही ते पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करीत होते. दुष्काळात जे कारखाने सुरु झाले त्याचा सर्वाधीक फटका पंढरपूरला बसला. पंढरपूच्या विकासाच्या ध्यासानेच त्यांची मानसिक परिस्थिती ढासळली गेली. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी अविरत कार्यरत राहणाऱ्या भारत भालके यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यात येईल, असे सांगून भारत भालके हे प्रत्येक वेळी वेगळ्या पक्षातून लढले असले तरी निवडून आल्यानंतर माझ्याकडे यायचे अन मी आहेच,असे हक्काने सांगायचे, असे खा. शरद पवार, यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत वेगळे काही होणार नाही. त्याची चर्चा करू नका. असेही सांगत अप्रत्यक्षपणे भगीरथ भालके हेच आमदार होतील, असे संकेत खा. शरद पवार यांनी दिले. विठ्ठल परिवार अधिक मजबूत व एकसंघ ठेवा असे म्हणत सर्वानी एकत्रीत येत काम करावे. असा सूचक इशारा चंद्रभागा कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना खा. पवार यांनी दिला.
आगामी निवडणुकीत वेगळे काही होणार नाही
![]() |
Sharad Pawar |
आगामी निवडणुकीत वेगळे काही होणार नाही. त्याची चर्चा करू नका. असेही सांगत अप्रत्यक्षपणे भगीरथ भालके हेच आमदार होतील, असे संकेत खा. शरद पवार यांनी दिले. विठ्ठल परिवार अधिक मजबूत व एकसंघ ठेवा असे म्हणत सर्वानी एकत्रीत येत काम करावे. असा सूचक इशारा चंद्रभागा कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना खा. पवार यांनी दिला.