तुम्ही इडी लावा आम्ही सिडी लावू - राष्ट्रवादी प्रवेशावेळी नाथाभाऊंची तुफान टोलेबाजी
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले . यावेळी बोलताना नाथाभाऊंनी तुफान टोलेबाजी करत , भाजपच्या नेतृत्वावर सडकून टीका केली . संघर्ष हा माझा स्वभाव असून मी कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नाही . तुम्ही ईडी लावली तर आम्ही सीडी लावू अशी मार्मिक शेरेबाजी करताना उपस्थितांसह शरद पवारांनाही हसू आवरले नाही . शिवशाही न्यूज च्या दर्शकांसाठी खास हा वृत्तांत