भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते खडसे यांनी भाजपा सोडली
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते खडसे यांनी भाजपा सोडली
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपा सोडली . २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत तिकीट कापल्यामुळे नाराज झालेले नाथाभाऊ गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते . अनेकवेळा त्यांनी आपली नाराजी पक्षासमोर श्रेष्ठीसमोर आणि मीडियासमोर बोलून दाखवली होती . त्यांच्या मुलीला रक्षा खडसे याना तिकीट देऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले , परंतु ये दिल मांगे मोअर म्हणत खडसे यांनी आपले बंडाचे निशाण फडकावतच ठेवले . खडसे भाजपा सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार तसे सूतोवाच राष्ट्रवादीच्या नेत्याकडून आधीच केले गेले होते . परंतु भाजपा नेते ह्या सगळ्या अफवा असल्याचे सांगत होते . नाथाभाऊंनी पक्ष सोडल्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचा चर्चेला दुजोरा मिळाला असून नाथाभाऊंसारखा तगडा नेता गळाला लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात उषाचे वातावरण आहे.