काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी पुन्हा विराजमान होण्याची शक्यता
![]() |
Rahul Gandhi |
शनिवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या महासमितीच्या बैठकीत काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांची अध्यक्ष पदासाठी राहुल गांधी यांच्या नावाला सहमती दर्शविल्याने आणि राहुल गांधी यांनी सुद्धा ही जबाबदारी स्वीकारण्यास तयारी दर्शविल्याने काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल गांधी विराजमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्याची आपली तयारी असल्याचे राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितले दरम्यान पक्षांतर्गत ज्या कुरबुरी सुरू आहेत त्या फारशा गंभीर नाहीत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली सर्व स्तरावर पक्षाला मजबूत बनवण्यावर नेत्यांनी चर्चा केल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते पवन बन्सल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
पक्ष्यांच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाने नवीन अध्यक्ष नियुक्त करावा अशा मागणीचे पत्र लिहिणारे असंतुष्ट नेतेही ही हजर होते बिहार विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवावर या बैठकीत चर्चा झाली पुढल्यावर्षी पंजाब आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यात होणाऱ्या निवडणुका विचारात घेऊन पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे सोपवावी असे अनेक नेत्यांनी सुचवले सोनिया गांधी यांनी या नेत्यांची सूचना मान्य करत राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद सोपवण्याची तयारी दर्शवल्याचे बन्सल यांनी सांगितले
या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ए के अँटनी चिदंबरम गुलाम नबी आझाद आनंद शर्मा शशी थरूर भूपेंद्र सिंग हुडा वेणुगोपाल रजदीप सिंह सुरजेवाला हरीश रावत पवन बन्सल यांच्याबरोबरच राहुल गांधी प्रियांका गांधी वाद्रा आणि सोनिया गांधी उपस्थित होते
पक्षाच्या मजबुतीसाठी ही बैठक बोलावली होती
आगामी काळात पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी ही बैठक बोलावली होती, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पुढे पक्ष चांगली कामगिरी करेल असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे सिमला आणि पंचमीच्या धर्तीवर पक्षांची पुन्हा महत्त्वपूर्ण बैठक होईल सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व जेष्ठ नेते उपस्थित होते आणि त्यांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्ष पदाला संमती दिली आहे यावरून पक्षात कोणतीही कुरबुर नाही हे स्पष्ट होते असेही ते म्हणाले
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा