maharashtra day, workers day, shivshahi news,

सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप ...

सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप...

revati, ravi vasant sonar, shivshahi news, sweater donation

स्वेटर वाटप करताना सोनार कुटुंब

पंढरपूर (प्रतिनिधी) : येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. व सौ. सविता रवि सोनार यांची सुवर्णकन्या कु. रेवती सोनार हिच्या जन्मदिवसाच्या औचित्याने होणाऱ्या अनावश्यक खर्चाला सोनार कुटुंबियांनी फाटा दिला आहे. परंतु वाचलेल्या रकमेतून त्यांची आस्थापना असलेल्या दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटरचे व्यवस्थापक व सहकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना लोकरीचे उबदार स्वेटर स्नेहभेट म्हणून दिले आहेत. सोनार परिवारातील सदस्य हे नेहमीच सामाजिक भान ठेवून वेगवेगळे सांस्कृतिक सण उत्सव, जन्मदिवस, रेशीमबंध दिवस अशा वैशिष्ट्यपूर्ण औचित्याने सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलत असतात.
revati, ravi vasant sonar, shivshahi news, sweater donation

स्वेटर वाटप करताना सोनार कुटुंब

          सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त कष्टकरी व होतकरू व्यक्तींना कडाक्याच्या थंडीत ऐन हिवाळ्याच्या दिवसात स्नेहभेट स्वरुपात स्वेटर भेट दिल्याने कष्टकरी व होतकरू व्यक्तींना उब मिळणार आहे. सोनार परिवाराच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे पंढरपूर आणि परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. आणि सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या परिवाराप्रमाणेच जास्तीत जास्त परिवारांनी सण-उत्सव आणि जन्मदिवसाच्या औचित्याने असे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविल्यास एकूणच समाजासाठी लाभ होईल असे मतही काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !