maharashtra day, workers day, shivshahi news,

विठ्ठल सहकारीच्या चेअरमन पदी भगीरथ भालके बिनविरोध



 विठ्ठल सहकारीच्या चेअरमन पदी भगीरथ भालके बिनविरोध

bhagirath bhalake , chairman, vithhal sugar, shivshahi news
bhagirath bhalake
पंढरपूर - ( बातमीदार ) विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी भारत नाना भालके यांचे सुपुत्र भागिराथ दादा भालके यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंढरपूरचे लोकप्रिय आमदार कै. भारत भालके यांचे  नुकतेच दुःखद निधन झाले. भारत भालके हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देखील होते त्यांच्या निधनाने विठ्ठल सहकारीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. प्रचंड अडचणीतून मार्गक्रमण करत असलेल्या विठ्ठल कारखान्याची जबाबदारी आता कोण पेलणार हा प्रश्न शेतकारी सभासदांना भेडसावत होता. परंतु शुक्रवारी खासदार शरद पवार साहेबांनी सरकोली भेटीत तालुक्याच्या राजकारणात काही वेगळे होणार नसल्याचा निर्वाळा दिल्याने नानांच्या जागी दादाच येणार याची भालकेंप्रेमी कार्यकर्त्यांना खात्री झाली होती. सध्याच्या घडामोडी पाहता तालुक्याच्या राजकारणात भगीरथ भालकेंचा वावर वाढणार असेच दिसत असून  त्यांच्या राजकीय कारकिर्दीची हि नवी सुरुवात म्हणावी लागेल.
 
bhagirath bhalake , chairman, vithhal sugar, shivshahi news
bhagirath bhalake


आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनानंतर रिक्त झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांची एकमताने निवड करण्यात आली सहाय्यक निबंधक तांदळे यांच्या उपस्थितीत आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये भगीरथ भालके यांची निवड करण्यात आली आमदार भारत भालके यांनी सलग अठरा वर्षे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची धुरा सांभाळली कारखान्याचे विस्तारीकरण त्यांनी केले परंतु गेल्या काही वर्षात कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे गेल्या वर्षी इतिहासात पहिल्यांदाच कारखाना बंद ठेवण्याची वेळ कारखाना प्रशासनावर आली होती यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी आमदार भारत भालके यांनी कोरुना च्या काळात सुद्धा मुंबईत ठाण मांडून कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज मंजूर करून आणले होते आणि कारखाना सुरू केला होता परंतु दरम्यान आमदार भारत भालके यांचे अकस्मात निधन झाल्याने आता कारखान्याची जबाबदारी त्यांचे पुत्र भगीरथ दादा भालके यांच्यावर सोपवण्यात आली आहे नूतन चेअरमन भगीरथ भालके यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत अडचणीत असलेला कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे पुढच्या महिन्यात साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे  ही निवडणूक भगीरथ दादा भालके यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !