महिला बचत गटासाठी व्यापारी गाळे उपलब्ध करावे
![]() |
खा. शरद पवार यांना निवेदन देताना अनिता नागणे |
पंढरपूर - (प्रतिनिधी) महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत मात्र बचत गटाच्या निर्माण केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठेत विक्री करण्यासाठी जागेचा अडचणी येत आहेत यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी गाळे अल्पदरात उपलब्ध व्हावेत तसेच महिला बचत गटासाठी गाळे राखीव ठेवण्यात यावेत अशी मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष अनिता नागणे यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली खा शरद पवार शुक्रवारी भारत भालके त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सरकोली येथे आले असता सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष अनिता नागणे यांनी पवार यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महिला बचत गटातून उत्पादन होणाऱ्या वस्तू बाजारपेठेत विक्री करण्यासाठी योग्य ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने महिला बचत गटांचा उत्पादन निर्मितीचा उद्देश साध्य होत नाही
स्थानिक बाजारपेठेमध्ये उत्पादित वस्तू विक्री करण्यासाठी नगर परिष दा कृषी उत्पन्न बाजार समिती यासह शासकीय स्तरावरील असलेल्या ठिकाणी महिला बचत गटांसाठी राखी व्यापारी गाळे निर्माण केले जावेत तसेच उपलब्ध असलेल्या गाळ्यामध्ये अल्पदरात महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाळे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे याप्रसंगी सोलापूर ओबीसी महिला अध्यक्ष साधना राऊत उपस्थित होत्या
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा