संपत्तीचे नुकसान हा बेजबाबदारपणा: मोदी
![]() |
Narendra modi |
नवी दिल्ली - (प्रतिनिधी) आंदोलनाच्या नावाखाली संपत्तीचे नुकसान करणेही देशाप्रतीची जबाबदारी नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी डेडिकेटेड फ्रेट कॅरीडोअर अर्थात डीएफसी च्या ऊर्जा-भाऊपूर सेक्शन च्या उद्घाटनप्रसंगी केले. उत्तर प्रदेशातील या सेक्शन च्या निर्मितीसाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च आला.कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, अनेक आंदोलने आणि मोर्चाच्या दरम्यान संपत्तीचे नुकसान केले जाते. ही संपत्ती कोणत्या सरकारची अथवा पक्षाची नसते तर ती जनतेची असते. अशा स्थितीत जे नुकसान होते, ते गरिबांचे राजकीय पक्षांना स्पर्धा करायचीच असेल तर ती त्यांनी पायाभूत सुविधांचा दर्जा, वेग आणि क्षमतेच्या संदर्भात करावी. मोदी म्हणाले, आज भारत जगातील मोठी आर्थिक शक्ती बनत आहे. देशात केवळ अत्याधुनिक रेल्वे गाड्यांची निर्मितीच नाही, तर निर्यातही केली जात आहे. गेल्या सहा वर्षाच्या काळात रायबरेली च्या मॉर्डन कोच फॅक्टरी ने पाच हजार पेक्षा जास्त नवे रेल्वे डबे बनवले आहेत. सन 2006 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. हा प्रकल्प कागदावर आणि फायली मध्येच दाबून ठेवला होता. तत्कालीन केंद्र सरकारकडून राज्य सोबत ज्या तत्परतेने चर्चा करावयास हवी होती. ती झाली नाही. परिणामी त्या वेळी योजना अटकली, लटकली आणि भटकली. अलीकडचे 100 वी किसान रेल्वे सुरू केली.या रेल्वेचा शेतकऱ्यांना नवनवीन बाजारपेठा पर्यंत पोहोचण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशातील अनेक स्थानके किसान रेल्वेची जोडले आहेत .राज्यात रेल्वेस्थानकाजवळ गोडाऊन आणि कोल्ड स्टोरेज क्षमता वाढवली जात आहे. औद्योगिक क्षेत्रात मागे पडलेल्या पूर्व भारताला डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर उपकारक ठरणार आहे. कॅरिडॉर मुळे किसान रेल्वेला विशेष लाभ होणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा