जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन दिवसात 332 अर्ज
सोलापूर-(प्रतिनिधी) जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी गेल्या बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात जिल्ह्यातील 323 उमेदवारांनी 332 अर्ज दाखल केले असल्याची माहिती ग्रामपंचायत निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यात 51 ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून त्यासाठी गेल्या दोन दिवसात बावीस उमेदवारांचे 23 अर्ज दाखल झाले आहेत. माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या असून यामध्ये दोन दिवसात बावीस अर्ज दाखल झाले आहेत. बार्शी तालुक्यातील 96 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून यामध्ये वीस जणांनी अर्ज दाखल केले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यामध्ये पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. मोहोळ तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या आहेत. त्यासाठी 123 अर्ज दाखल झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींच्या सदस्यत्वासाठी 82 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. माळशिरस तालुक्यातील 49 ग्रामपंचायती साठी पाच जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सांगोला तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून त्यामध्ये सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामध्ये चार जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीसाठी 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीसाठी 19 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आजतागायत 332 अर्ज दाखल झाले असल्याची ची माहिती निवडणूक शाखेच्यावतीने देण्यात आली आहे.
सुट्टीच्या दिवशी ही कार्यालय सुरू राहणार
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची पोचपावती अर्जासोबत जोडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय २५,२६,व२७ डिसेंबर 2020 रोजी सुरू ठेवण्यात येत असल्याची माहिती उपयुक्त तथा समितीच्या सदस्य छाया गाडेकर यांनी दिली आहे.
जात पडताळणीसाठी विशेष कक्षाची स्थापना: गुरव
ग्रामपंचायत निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांच्या जात पडताळणी प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी तहसील कार्यालयात विशेष कक्षाची ची स्थापना करण्यात आली आहे.त्यामुळे 25 आणि 26 डिसेंबर रोजी कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा