पंढरपूर शहरात १६ लाखांची चोरी
![]() |
gharfode |
पंढरपूर- (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महावीर नगर येथे १५ लाख ७० हजार रुपयाचे सोने, चांदी, नाणे असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 1 ते 13 डिसेंबर या दरम्यान घडली आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
महाविर नगर परिसरात अजित फडे यांचे फर्निचरचे दुकान आहे. फडे हे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरीची घटना 1 डिसेंबर ते 13 डिसेंबर या काळात घडली असल्याची तक्रार शहर पोलिसात संजीवनी फडे यांनी बुधवार सायंकाळी देण्यात आली. या तक्रारीत म्हटले आहे की, बाहेरगावाहून 13 डिसेंबर रोजी परत आल्यानंतर चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून प्रवेश केला. घरात साडीच्या गाठोड्यात बांधून ठेवलेले बारा लाख 63 हजार 400 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, दोन लाख तीन हजार 700 रुपयांचे चांदीचे दागिने तसेच 900 रुपये किमतीची पितळी समई, भांडी, एक हजार रुपये किमतीचा कॅमेरा, एक मोबाईल तसेच पन्नास हजारांची रोख रक्कम, असा एकूण पंधरा लाख सत्तर हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे. पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपस करत आहेत .
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा