ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी २३ तारखेपासून सुरु
![]() |
gram panchayat |
सोलापूर - (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, काल दिनांक 23 पासून या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे संभाव्य उमेदवारांची खऱ्या अर्थाने कसरत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 658 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली असून 23 ते 31 डिसेंबर यादरम्यान नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 31 डिसेंबर रोजी आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. चार जानेवारी पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर संभाव्य उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवार आता निवडणुकीच्या कामाला लागले असून यासाठी आता निवडणूक यंत्रणा ही सज्ज झाली आहे. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज भरून त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे आणि घोषणा पत्र उमेदवारांनी ऑफ लाईन मध्ये संबंधित गावासाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आणून देण्याचा सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा