भर दुपारी पती-पत्नींचे हातपाय बांधून दीड लाखांचा ऐवज लुटला
![]() |
crime news |
सोलापूर (प्रतिनिधी) जुळे सोलापूर येथील बॉम्बे पार्क, गंगाधर नगर येथे राहणारे समीर बिराजदार यांच्या घरात घुसून पती-पत्नींचे हात-पाय बांधून बेडरूममधील लोखंडी कपाट तोडून सोन्याचे दागिने व रोकड, असा १ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला याप्रकरणी ६ अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 22 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
जुळे सोलापूर, बॉम्बे पार्क, गंगाधर नगरात राहणारे समीर लालासाहेब बिराजदार व त्यांची पत्नी 22 डिसेंबर रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवण करून मुख्य दरवाज्याच्या आतील कडी-कोयंडा लावून झोपले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या बेडरुमच्या दरवाजा चा आवाज आला.
त्यामुळे समीर बिराजदार हे झोपेतून उठले. त्यावेळी अनोळखी सहा चोरटे हे समीर यांच्या बेडरुमच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरुममध्ये प्रवेश करत होते. त्यावेळी त्यांना पाहून समीर हे मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले. तो आवाज ऐकून समीर यांची पत्नीसुद्धा जागी झाली. त्यावेळी त्या सहा जणांनी समीर बिराजदार व त्यांची पत्नी या दोघांचे हात पाय ओढणीने बांधले व त्यांना एका कोपऱ्यात टाकले व त्या दोघांची तोंडे बांधून आरडाओरडा केल्यास मारण्याची धमकी दिली व बेडरूममधील कपाट लोखंडी रॉड ने तोडून कपाटातील 38 हजार पाचशे रुपयांची ५०० रुपयांची रोकड व 80 हजाराचे सोन्याचे गंठण, कानातील सोन्याची रिंग, हातातील सोन्याचा कडा, तीन सोन्याच्या अंगठ्या तसेच गोल्डन कलर चे हातातील घड्याळ, दोन मोबाईल असा १ लाख ३२ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरू नेला
याप्रकरणी अज्ञात ६ चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा