![]() |
पंढरपूरात थंडीची लाट |
पंढरपूर - (प्रतिनिधी ) पंढरपूर आणि परिसरात थंडीची लाट पसरली आहे. मागच्या ३ दिवसापासून थंडीचा कडाका वाढला असून रक्त गोठवणाऱ्या थंडीमुळे रात्री आणि पहाटे रस्त्यावरची वर्दळ तुरळक दिसत आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर मुळातच लोक फारसे घराबाहेर पडत नाहीत, त्यातून वाढत्या थंडीमुळे हि संख्या आणखी कमी होताना दिसत आहे.
![]() |
पंढरपूरात थंडीची लाट |
पहाटे सर्वत्र धुक्याची दुलई पसरत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे परिधान करत आहेत. चहाच्या दुकानावरही गर्दी पडत आहे. लोक लोकरीचे उबदार कपडे खरेदी करणे पसंत करत आहेत. संध्याकाळच्या वेळी जागोजागी शेकोट्या पेटवून गप्पांच्या मैफिली रंगत आहेत तर काही निसर्गप्रेमी थंडीचा आनंद घेत आहेत. थंडीची हि लाट आणखी काही दिवस अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा