विठ्ठल मंदिरासमोर भाजपचे आंदोलन
मंदिर खुले करण्याची केली मागणी
![]() |
BJP solapur |
पंढरपूर - बातमीदार ( शिवशाही न्यूज ) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून देशभरात लॉक डाऊन केले होते . त्यातून मंदिरेही वगळली नव्हती , परंतु आता हळू हळू हॉटेल चित्रपटगृहे यांना काही बंधने घालून परवानगी दिली जात आहे . यातच महाराष्ट्राचे आराध्य असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने विठ्ठल मंदिर परिसरात आंदोलन करण्यात आले.
" एकीकडे कोरोनाचा प्रभाव वाढत आहे , तरीही राज्यसरकार बियर बार दारूची दुकाने हॉटेल चित्रपटगृहे, सुरु करून राज्यात हळू-हळू अनलॉक करत आहे . इतकंच काय शाळा आणि महाविद्यालये सुद्धा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे . मग पंढरपूर मंदिराच्या बाबतीतच सरकार दुटप्पी भूमिका का घेत ?' आहे असा प्रश्न भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी उपस्थित केला.
विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्राची अस्मिता आणि लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे . त्यामुळे मंदिर दर्शनासाठी खुले करावे , या मागणीसाठी जिल्हा भाजपच्या वतीने दि. ११ रोजी कमला एकादशीच्याच दिवशी मंदिरासमोर नामदेव पायरी जवळ सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले . देशातील अनेक धार्मिक स्थळे सुरु झाली असताना विठ्ठल मंदिरबंद ठेवून सरकार भाविकांची अडवणूक करत आहे. मंदिरामुळे माणसाला संकटात जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते. अनलॉक जाहीर झाल्यावर एकीकडे खाजगी दुकाने , सार्वजनिक वाहतूक , दारूची दुकाने, बियर बार सुरु केली आहेत मात्र मंदिर गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे या मंदिरावरच पूजा साहित्य , प्रसाद, हारफूले इ. विकणारे व पंढरपुरातील इतर व्यावसायिक यांची हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो मंदिर बंद असल्याने अश्या अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून सरकारच्या त्यांब्यातून विठ्ठलाला मोकळे करण्यासाठी जिल्हा भाजपच्या वतीने मंदिरासमोर नामदेव पायरीजवळ भजन आंदोलन करण्यात आले .
'बंद मंदिरे , उघडे बार , उद्धवा ! धुंद तुझे सरकार '
अश्या घोषणा देऊन सरकारवरील रोष व्यक्त करण्यात आला .
यानंतर पोलिसांकडे निवेदनदेण्यात आले . या आंदोलनाच्या वेळीज भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख , उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, शंतनू दंडवते महिला आघाडी अध्यक्षा शकुंतला नांदगिरे नवनाथ पवार , प्रणव परिचारक, शिरीष कटेकर , अपर्णा तारके , अनिल अभंगराव , विठ्ठल अधटराव, आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते