maharashtra day, workers day, shivshahi news,

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपा सोडली

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपा सोडली . २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत तिकीट कापल्यामुळे नाराज झालेले नाथाभाऊ गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते . अनेकवेळा त्यांनी आपली नाराजी पक्षासमोर श्रेष्ठीसमोर आणि मीडियासमोर बोलून दाखवली होती . त्यांच्या मुलीला रक्षा खडसे याना तिकीट देऊन पक्षाने  त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले , परंतु ये दिल मांगे मोअर म्हणत खडसे यांनी आपले बंडाचे निशाण फडकावतच ठेवले . 

shivshahi news, eknath khadase, BJP, NCP
eknath khadase



            त्यांनी आपल्यावर होत असलेल्या पक्षांतर्गत अन्यायासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना जबाबदार धरत, बहुजन कार्ड सुद्धा वापरून पहिले . परंतु भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केल्याने नाथाभाऊंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला . गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज असलेले नाथाभाऊंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले , तसे नाथाभाऊ अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असल्याने आणि सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबध असल्याने त्यांना कोणत्याही पक्षात जात येत होते . परंत गेल्या निवडणुकीपासूनच नाथाभाऊंची राष्ट्रवादी सोबत जवळीक वाढली होती . तेव्हाही राष्ट्रवादीने त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिलेच होते पण तेव्हा नाथाभाऊ वेट अँड वॉच भूमिकेत असल्याने नाथाभाऊंनी राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नव्हता . परंतु आता भाजपात राजकीय पुनर्वसनाची कोणतीच शक्यता नसल्याने नाथाभाऊंनी पक्ष सोडण्याचा निर्णय पक्का केला , आणि भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला . 

shivshahi news, eknath khadase, BJP, NCP, devendra phadanvis
eknath khadase


    खडसे भाजपा सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार तसे सूतोवाच राष्ट्रवादीच्या नेत्याकडून आधीच केले गेले होते . परंतु भाजपा नेते ह्या सगळ्या  अफवा असल्याचे सांगत होते . नाथाभाऊंनी पक्ष सोडल्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचा चर्चेला दुजोरा मिळाला असून नाथाभाऊंसारखा तगडा नेता गळाला लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात उषाचे वातावरण आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !