विनापास,विनापरवाना रायवळ जातीचा लाकुडमालाची वाहतुक
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
)
शुक्रवार दि.12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी वाई वनपरिक्षेत्रामधील वाई-पाचवड रस्त्यावर सायंकाळी फिरती तपासणी करताना वनपाल भुईंज,वनरक्षक बेलमाची यांना MH-11 AL-3347 मधुन विनापासी,विनापरवाना रायवळ जातीचा लाकुडमाल वाहतुक करत असताना आढळल्याने आरोपी राहुल ज्ञानेश्वर भिसे,रा.सरताळे,ता.जावली याला वाहनासह ताब्यात घेवुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर वाहनामध्ये रायवळ प्रजातीचा लाकुडमाल आढळुन आला आहे.
सदर गुन्ह्यामध्ये भारतीय वन अधिनीयम नुसार उल्लंघन झालेने आरोपीवर वनरक्षक बेलमाची यांनी शुक्रवार दि.12 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नोंदवला आहे.सदर कारवाई मध्ये सुमारे अडीच लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन पुढील तपास चालु आहे.सदरची कारवाई मा.उपवनसंरक्षक अमोल सातपुते ,मा.सहाय्यक वनसंरक्षक प्रदिप रौंधळ ,मा.वनक्षेत्रपाल वाई महादेव हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भुईंज दिलीप व्हनमाने व वनरक्षक बेलमाची अश्विनी नरळे यांनी केली आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














