चवनेश्वर ११ संघाने पटकावला प्रथम क्रमांक
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली विद्यानिकेतन प्रीमियर लीग २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे पहिले पर्व वाई येथील महर्षी शिंदे कॉलेजच्या क्रीडांगणावर नुकतेच उत्साहात व शिस्तबद्ध नियोजनाने पार पडले. ११ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.
या स्पर्धेत वाई तालुक्यातील तब्बल १६ संघ मालकांनी सहभाग घेतला, ज्यात २४० खेळाडूंनी आपली गुणवत्ता दाखवली. तसेच १६ आयकॉन खेळाडूंनीही सहभाग घेतला होता. ईशान्य पॅकर्स, काळेश्वरी ११, अभय ११, काळभैरवनाथ ११, चवनेश्वर ११, ओंकार ज्वेलर्स व ज्योति ज्वेलर्स भुईंज, खोडियार माता वॉरियर्स, पसरणी वॉरियर्स, अष्टविनायक वॉरियर्स, अनुज वॉरियर्स, काव्या ११, स्वरा ११, विकेसी ११, नाथ साहेब ११, तेजदीप ११, शिव इंटिरिअर ११ अशा संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
संस्थेच्या सभासदांनी गेल्या दोन महिन्यांपासून या स्पर्धेचे नियोजन केले होते.
स्पर्धेच्या समारोप समारंभाला आणि बक्षीस वितरणावेळी विद्यानिकेतन संस्थेचे उपाध्यक्ष नितीन वरखडे, सत्यजित माने देशमुख, वाई उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम (शेठ) जेधे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, जितू पिसाळ, अमोल काळे, सुनील जांभळे, गणेश सावंत, प्रवीण जाधव,अर्जुन गोळे, पंकज वाडकर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
विद्यानिकेतन प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व सभासद - गणपत शेठ सणस, शांताराम गोळे, संतोष वाडकर, अजित श्रीरंग वरे, समीर शिवाजी गाढवे, अंकुश चिकणे, निलेश भोसले, राजू शिर्के, निलेश माने, युवराज शिंदे, विलास गायकवाड, तरुण सोनवणे, काका भुसारी, राजू बागवान आणि इतर सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विजयी संघांचे आणि वैयक्तिक पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन!
स्पर्धेतील विजेते संघ आणि पारितोषिकप्रथम क्रमांक: श्री चवनेश्वर ११पारितोषिक: रोख रक्कम १ लाख रुपये व चषक संघमालक: पंकज वाडकर व निलेश भोसले.द्वितीय क्रमांक: श्री काळेश्वरी ११पारितोषिक: रोख रक्कम ७१ हजार रुपये व चषक संघमालक: अमित सुर्वे, राहुल वानखेडे, गणेश साळुंखे तृतीय क्रमांक: अभय ११ पारितोषिक: रोख रक्कम ५१ हजार रुपये व चषक संघमालक: राजीव शेठ शिर्के चतुर्थ क्रमांक: श्री खोडियार माता वॉरियर्स (खानापूर स्टॉप) पारितोषिक: रोख रक्कम ४० हजार रुपये व चषक संघमालक: संदीप चव्हाण, सोमनाथ मोरे वैयक्तिक पुरस्कारांचे मानकरी मॅन ऑफ द सिरीज: स्वरंजन गायकवाड (श्री चवनेश्वर ११) बेस्ट बॅट्समन: मनिष मांढरे (श्री काळेश्वरी ११)बेस्ट बॉलर: प्रवीण पोळ (गाव - कवठे) बेस्ट फिल्टर: नवनाथ वाशिवले (गाव- वाशिवली)
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














