पोलीस अधीक्षक तुषार दोशींपुढे एक आव्हान
शिवशाही वृत्तसेवा, वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्ह्यात ड्रग्ज माफीयांची पाळेमुळे गावागावात वाढीवस्तीपर्यंत पोहोचलेली आहेत.हे बामणोली ता. जावली येथील सावरी या दुर्गम भागात मुंबई क्राईम ब्रांचने शनिवारी पहाटे मेफेड्रॉन (एम.डी.) फॅक्टरीवर छापा टाकून ११५ कोटींचे मोठे घबाड पोलीसांनी हस्तगत केले.ड्रग माफियांचे केंद्रबिंदू बनू पहात असलेल्या सातारा जिल्ह्याला यामुळे कलंक लागला आहे. उडता पंजाब च्या धर्तीवर सातारा जिल्ह्याची वाटचाल होऊ पाहात आहे का? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.याचा नायनाट करणे हे मोठे आव्हान जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्यापुढे आहे.सातारा जिल्ह्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी जात असून यामुळे पालक वर्ग चिंतेत आहेत.
विशेषतः शालेय व महाविद्यालयीन तरुणाई याकडे विशेष आकर्षिले जात आहे त्यामुळे ड्रग्ज माफियांचा जिल्ह्यात सुळसुळाटही वाढला आहे यावरती अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी ठोस कृतिशील धोरण पोलीस दलाकडून आखण्यात यावे अशी अपेक्षा जिल्हावासियांची आहे.जिल्ह्याला पडलेला ड्रग्सचा विळखा तरुणाईसाठी घातक ठरणार असून यावरती वेळीच उपायोजना होणे गरजेचे आहे.ड्रग्ज माफियांच्या नायनाट हे आव्हान ते सक्षमपणे पेलतील याबाबत सातारावासियांना खात्री आहे.पोलीस दलातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव व त्यांनी आजपर्यंत केलेली कामगिरी पाहता त्यांच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत.सातारा जिल्ह्यात गांजा, चरस, एमडी व विविध अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट असून ते उध्वस्त करणे काळाची गरज आहे.आजपर्यंत सातारा पोलीस दलाने विविध ठिकाणी छापेमारी करून ड्रग्ज माफियांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला आहे.तरीही हे ड्रग्ज माफिया विविध मार्गाने तरुणांपर्यंत पोहोचत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख हे कर्तव्यदक्ष आहेत त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून ड्रग्ज माफियांचे अड्डे उध्वस्त करावेत.
पुणे मुंबईचे ड्रग्जचे लोन आता सातारा जिल्ह्यात पसरले आहे.त्यामुळे हा सामाजिक विषय निर्माण झाला आहे.अंमली पदार्थाच्या सेवन यामध्ये तरुणाई मध्ये मोठे आकर्षण वाढले आहे. ही चिंतेची बाब आहे.रेव्ह पार्टी व चंगळवादी वृत्ती याच्या आहारी गेलेली तरुणाई वास्तव जीवनाचे भान विसरलेली आहे. काही महिन्यांपूर्वी कराड तासवडे एमआयडीसी येथे दिनांक २३ मे रोजी पोलीस दलाने अमली पदार्थाच्या ठिकाणी छापे मारून सहा कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली होती.यापूर्वीही सातारा शहरात सुशिक्षित वर्गातील तरुणाईला ड्रग्जचे इंजेक्शन विकत घेताना पोलीसांनी पकडले होते.जिल्ह्याच्या विविध भागात ड्रग्स वितरित करणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्याबाबत अधिक शोध पोलीस दलाने घ्यावा.
सातारा जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे देशातील पर्यटकांच्या बरोबरच परदेशी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे ड्रग माफियांच्या नजरा आता सातारा जिल्ह्याकडे वळल्या आहेत.परिणामी सातारा जिल्हाच्या विविध ठिकाणी अमली पदार्थांचे साठे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.पोलीस प्रमुख तुषार दोशी यांचा पोलीस दलात प्रदीर्घ अनुभव असून ते जिल्ह्याच्या विविध समस्या व प्रश्नांची उकल करून आपले कर्तुत्व ते सिद्ध करतील याची खात्री सातारावासियांना आहे.
श्रीरंग काटेकर
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














