पोलिसातील माणुसकीचे दर्शन
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
भुईज पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत असलेले ट्रॅफिक पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांच्या अथक प्रयत्नामुळे ट्रॅव्हल्स बसमध्ये विसरलेली पैशांची पर्स एका महिलेस सुखरूप परत मिळाली.
आसरे (ता. वाई) येथील रहिवासी कविता शिवराज सणस या आपल्या मुलींच्या शाळेची फी भरण्यासाठी वाई येथे ट्रॅव्हल्स बसने प्रवास करत असताना त्यांनी पैशांची पर्स असलेली बॅग बसमध्येच विसरली होती. सदर पर्समध्ये १३ हजार ५०० रुपये रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे व कपडे होते.
ही बाब लक्षात येताच पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांनी तत्काळ प्रयत्न करून संबंधित ट्रॅव्हल्स बसचा शोध घेतला. भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पर्स मिळवून महिलेस समक्ष परत करण्यात आली.या घटनेतून पोलिस दलातील प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन नागरिकांना घडले आहे.
वाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, भुईज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे तसेच पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे यांनी पोलीस नाईक सुशांत धुमाळ
यांच्या प्रामाणिकपणा व तत्परतेबद्दल अभिनंदन केले.
सदर बॅग मिळण्यासाठी टोलनाका व्यवस्थापनाचे गांधी साहेब तसेच त्यांचे कर्मचारी अविनाश फरांदे राजेंद्र भोसले मिथुन चौगुले बिपिन मनोज भिलारे वैभव किर्दत भुईंज पोलीस स्टेशनचे अमलदार रोहन चव्हाण अजित पवार यांचे सहकार्य लाभले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














