प्रबोधनातून गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई पोलीस खात्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र प्रभाकर शहाणे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. याआधीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची सातारा जिल्ह्यात विशेष शाखेत बदली झाल्याने रिक्त जागेवर त्यांनी पदभार स्वीकारला. बाळासाहेब भरणे यांनीही सातारा येथे आपला पदभार स्वीकारला.
पोलीस निरीक्षक म्हणून अमरावती व पुणे येथे सीआयडी, सांगली येथे काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात सन 2016 मध्ये मिरज येथे दरोडा पडला असता त्यातील दहा आरोपी मुद्देमालासह दोन दिवसात पकडून त्यांनी विशेष कामगिरी केली होती.
वाईतील वाहतुकीची समस्या, बाल गुन्हेगारी व प्रबोधन, तडीपार गुन्हेगार या बाबीसह इतर सर्व बाबीत ते विशेष लक्ष देणार आहेत. वाई पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचा विशेष प्रयत्न करणार आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






