ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाक्षेत्रासह महाराष्ट्रावर शोककळा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून भावूक श्रद्धांजली

​'अष्टपैलू कलाकार आणि संवेदनशीलता जपणारा सच्चा समाजसेवक गमावला, महाबळेश्वर दौऱ्यावर असताना आठवलेंनी व्यक्त केल्या शोकभावना
Nana Patekar, Ramdas Athavale, mahabaleshwar, satara, shivshahi news,

​शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाची धक्कादायक बातमी समोर आल्याने कला क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या आक्रमक आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान कलाकाराच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत भावुक शब्दांत आपली शोकसंवेदना व्यक्त केली.
​अभिनयाचा वेगळा ठसा आणि सामाजिक बांधिलकी
सध्या महाबळेश्वर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "नाना पाटेकर हे अत्यंत धडाडीचे, सक्रिय आणि समाजाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणारे ज्येष्ठ कलाकार होते. 'प्रहार', 'नटसम्राट', 'परिंदा' यांसारख्या अनेक अजरामर चित्रपटांमधील त्यांचा अभिनय आणि त्यांची बोलण्याची खास शैली जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणारी होती. ते अत्यंत अ‍ॅक्टिव्ह आणि लोकांना सहजरीत्या आपलेसे करणारे कलाकार होते."
​त्यांच्या सामाजिक योगदानाचा विशेष उल्लेख करताना आठवले पुढे म्हणाले, "नाना हे केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते, तर अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक दृष्टिकोन असणारे महान व्यक्ती होते. मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या मदतीसाठी त्यांनी पुढाकार घेऊन 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक सामाजिक कार्य केले."
​भेटीची अपूर्ण राहिलेली इच्छा अन् हळहळ
नाना पाटेकर यांच्या भेटीच्या आठवणी सांगताना आठवले भावुक झाले. "गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी एका मित्राने नानांना भेटायचा संदेश दिला होता. परंतु माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे पुण्याला जाऊन त्यांची भेट घेता आली नाही, याची खंत आयुष्यभर मनाला चटका लावत राहील," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच नानांच्या अंत्यविधीसाठी मी स्वतः पुण्याला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
​कधीही भरून न निघणारी पोकळी
केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, "भारत सरकारने नाना पाटेकर यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या व देशाच्या कलाक्षेत्रात, चित्रपटसृष्टीत आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आणि केंद्र सरकारच्या वतीने मी त्यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
​दौऱ्यादरम्यान अनेक मान्यवरांची उपस्थिती
केंद्रीय मंत्र्यांच्या या महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी रिपब्लिकन पक्ष व महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड, तालुका अध्यक्ष जॉन भाई जोसेफ, कार्याध्यक्ष आतिश भोसले, महाबळेश्वर शहर अध्यक्ष विनय गायकवाड, उद्योजक आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष मिथुन तलवलकर, शहराध्यक्षा फौजिया मुलाणी, सातारा विधानसभा संघटक (शिवसेना शिंदे गट) रोहित कटके आणि चंदू इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !