सेवा संकल्प अभियानातून वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण

मोफत सूर्य घर 172, नवीन वीज जोडणी 135 तर स्मार्ट सोलर योजनेसाठी 10 अर्ज प्राप्त
Through the Seva Sankalp Abhiyan, Solapur, Pandharpur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी 
 पंढरपूर-(01):- सेवा संकल्प अभियानांतर्गत महावितरणकडून पंढरपूर महावितरणच्या वतीने तहसील कार्यालय, पंढरपूर येथे जनजागृती माहिती स्टॉल उभारण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे .तसेच वीज ग्राहकांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जात आहे सोबतच वीज ग्राहकांचे अर्ज स्वीकारले जात असून, यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचत आहे.
 या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रधानमंत्री सूर्यग्रह मोफत वीज योजनांचे नोंदणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच महावितरण संबंधित वीज जोडणी, वीज मीटर तसेच इतर वीज विषयक समस्यांचे निराकरण महावितरणच्या समन्वय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना वीज बचत ,सौर ऊर्जा वापर, प्रधानमंत्री सूर्यग्रह मोफत वीज योजना, विद्युत सुरक्षा तसेच महावितरणच्या सेवांबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यात येत आहे. पंढरपूर तालुक्यातून अभियानांतर्गत दि. 17 सप्टेंबरपासून प्रधानमंत्री मोफत सूर्य घर योजनेसाठी 172, नवीन वीज जोडणी 135, स्मार्ट सोलर योजनेसाठी 10 अर्ज प्राप्त झाले आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सुविधा अधिक सुलभ व पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. वीज जोडणी, वीज दुरुस्ती,स्मार्ट योजना, छतावर वीज निर्मिती करणे आदी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना दिली जात आहे तसेच इच्छुक ग्राहकांचे अर्जही यावेळी स्वीकारले जात आहेत.
         -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !