इचलकरंजीत कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा - शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण!

प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी भेटीगाठी - विजयासाठी सहकार्याचे आवाहन
Teacher constitution election, kaustubh gawade,ichalkaranji, sangali, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, इचलकरंजी
पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीतील भाजप महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना इचलकरंजी शहर व परिसरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रचाराला गती देण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी इचलकरंजीतील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या भेटींमुळे शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दौऱ्यात डीकेटीईचे संचालक सुनील पाटील आणि प्रा. शेखर शहा यांची विशेष उपस्थिती होती. प्राचार्य साळुंखे यांनी विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी देत संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. या संवादातून कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.

या भेटीगाठींमध्ये माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी आमदार अशोकराव जांभळे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार राजूबाबा आवळे, ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे कृष्णाजी बोहरा व श्रीनिवासजी बोहरा, व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कौशिक मराठे, तात्यासाहेब विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे धोंडीराम कस्तुरे, ना. बा. एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त व नॅशनल हायस्कूलचे अहमद मुजावर, श्रद्धा परिवाराचे प्रा. ए. आर. तांबे, खंजिरे शिक्षण समूहाचे अरुण खंजिरे व राहुल खंजिरे, सरस्वती हायस्कूलचे अमरसिंह माने आणि गुरुकुल संस्थेचे गणेश नायकवडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश होता.

यावेळी मान्यवरांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि कौस्तुभ गावडे यांचे नेतृत्व, कार्यक्षमता व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यांचा उल्लेख करत त्यांना सहकार्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणी समजून घेणारे नेतृत्व विधान परिषदेत पोहोचणे आवश्यक असल्याची भावना या संवादातून व्यक्त झाली.
“कौस्तुभ गावडे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केला. 

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सक्षम प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या या भेटीगाठींमुळे इचलकरंजी शहर व परिसरातील प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चा आणि पाठिंब्याचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !