पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचा जाहीर पाठिंबा

जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची गावडे यांची ग्वाही
Teacher constitution election, kaustubh gawade, kolhapur, Maharashtra, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, कोल्हापूर 
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने जाहीर पाठिंबा दिला. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावी व्यासपीठ मिळावे, तसेच जुनी पेन्शन योजनेच्या मागणीला बळ मिळावे, या दृष्टीने या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या जाहीरनाम्यातील पहिल्याच विषयाशी संबंधित जुनी पेन्शन समन्वय संघटनेने पाठिंबा दिल्याने त्यांची ताकद वाढली आहे.

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, निवडणूक सहप्रमुख डॉ. प्रशम कोल्हे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कुंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.

नागपूरहून आलेले श्री. कडू सर यांनी, शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे हे फक्त पुणे विभाग शिक्षक मतदार संघापुरते मर्यादित नसून ते जुनी पेन्शन समस्येबाबत संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे ते नक्कीच जुनी पेन्शनसाठी कार्यरत राहतील, असा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी सुभाष माने, तानाजी माने, नंदकुमार सागर, प्रसाद गायकवाड, संजयकुमार झांबरे, सचिन नलवडे, दत्ता पाटील, बाबा पाटील, संदेश राऊत, विजय येवले, सुधाकर जगदाळे, शशिकांत शिंदे, रामचंद्र मोहिते, भरत मोजर , देविदास कठाळे आणि दत्तात्रय घुगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे म्हणाले, “जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणाऱ्या शिक्षक आणि कर्मचारी बांधवांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब असून त्याईचबरोबर मोठी जबाबदारीही आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जुनी पेन्शन हा केवळ निवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभाचा विषय नसून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न आहे.”

ते पुढे म्हणाले, “शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ शिक्षणव्यवस्थेच्या उभारणीसाठी समर्पित केलेला असतो. त्यांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित होणे आवश्यक आहे. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी संबंधित घटकांशी संवाद साधून प्रभावी पाठपुरावा करण्याचा माझा प्रयत्न राहील. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर राखून त्यांच्या मागण्या योग्य त्या व्यासपीठावर मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” अशी ग्वाही दिली.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्यातील शिक्षक आणि विविध शासकीय कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता, सेवाशर्ती, सामाजिक क्षेत्रातसंरक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याची हमी या मुद्द्यांशी ही मागणी निगडित आहे. त्यामुळे या प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा संबंधित कर्मचारी संघटनांकडून व्यक्त केली जाते. 

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने कौस्तुभ गावडे यांना दिलेला जाहीर पाठिंबा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. संघटनेने व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवून जुनी पेन्शन योजनेसह शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या निवारणासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही गावडे यांनी दिल्याने या निवडणुकीत कर्मचारीहिताचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !