कुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!श

माजी आमदार बबनदादा शिंदे व संजयमामा शिंदे यांचा जाहीर पाठिंबा; शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटींतून प्रचाराला वेगKaustubh Gawade's stormy campaign, Solapur, kurudwadi, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, कुरूडवाडी प्रतिनिधी

कुर्डूवाडी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने कुर्डूवाडी-माढा परिसरात वेग घेतला आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय नेतृत्व माजी आमदार श्री. बबनदादा शिंदे आणि माजी आमदार श्री. संजयमामा शिंदे यांनी कौस्तुभ गावडे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांच्या प्रचाराला बळ मिळाले आहे.

युवा, अभ्यासू आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाला विधान परिषदेत संधी मिळणे ही काळाची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने कुर्डूवाडी आणि माढा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे. विविध शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देत शिक्षकांच्या समस्या, सेवाविषयक प्रश्न, प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा करण्यात आली. या प्रत्यक्ष भेटींमुळे प्रचाराला केवळ राजकीय स्वरूप न राहता शिक्षकांशी संवाद साधणारी आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेणारी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

कुर्डूवाडी परिसरातील जिव्हाळा सुसंस्कार मंदिर, आंतरभारती विद्यालय, नूतन विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, महात्मा ज्योतिबा फुले ज्युनिअर कॉलेज, आदर्श पब्लिक स्कूल, डॉ. नेताजी करळे पब्लिक स्कूल आणि भोसरी येथील विनायकराव पाटील हायस्कूल आदी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांच्या भेटी घेण्यात आल्या. या भेटींच्या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांच्या शैक्षणिक कार्याची, शिक्षकांच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेची आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या निर्धाराची माहिती देण्यात आली.

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार कमी करणे, जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न, प्राध्यापकांच्या मानधनवाढीचा विषय, सेवासुरक्षा आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देणे, या विषयांना या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करून शासनदरबारी त्यांचा पाठपुरावा करणारे नेतृत्व विधान परिषदेत असावे, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
या प्रचार दौऱ्यादरम्यान शिक्षक बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या भूमिकेतून अनेक शिक्षकांनी कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षकांच्या प्रश्नांशी जोडलेले नेतृत्व आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव यांच्या जोरावर कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी कुर्डूवाडी-माढा परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

या प्रचार उपक्रमात सोलापूर जिल्हा निवडणूक प्रचारप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, मुख्याध्यापक श्री. जयप्रकाश पाटील, मुख्याध्यापक श्री. दिलावर मुलानी, श्री. सुनीलतात्या नलवडे, मुख्याध्यापक श्री. मल्लाव सर, तालुकाप्रमुख श्री. संजय कोयले, प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. प्राची जगताप, प्रा. करण पाटील, प्रा. मालोजी पवार, प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर आणि श्री. आकाश गोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणारे, त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे भूमिका मांडणारे आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत राहणारे नेतृत्व विधान परिषदेत पाठविण्याच्या उद्देशाने कुर्डूवाडी-माढा परिसरातील प्रचाराला अधिक गती मिळत असल्याचे चित्र आहे.
       -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !