वाई तालुका काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

 आगामी निवडणुका आणि जनआंदोलनाची रूपरेखा निश्चित
Crucial Congress meeting, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई तालुका काँग्रेस पक्षाची अत्यंत महत्त्वाची नियोजन बैठक आज (दि. ७) सायंकाळी ५ वाजता हॉटेल मधुबन, सिद्धनाथवाडी, वाई येथे पार पडली. या बैठकीत शिक्षक मतदार बंधू-भगिनींपर्यंत पोहोचून आमदार जयंत आसगावकर यांच्या शिक्षक आमदार उमेदवारीचा प्रचार वेगाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भव्य मोर्चाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला. तसेच, त्यांच्यावर झालेल्या पोलिसी कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आगामी रणनीतीवर सांगोपांग विचारविनिमय करण्यात आला. तसेच, सर्वसामान्य जनतेच्या प्रमुख प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे आणि वनपाल श्रीमती सविता रेड्डी पाटील यांना निवेदन देण्याचे ठरले. जनतेच्या हिताची कामे मार्गी लावण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभे करण्याचा एकमुखी निर्णय या वेळी घेण्यात आला.
या बैठकीस वाई तालुक्यातील काँग्रेसचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रदीप जायगुडे, कल्याण पिसाळ, फय्याज बागवान, धनश्री मालुसरे, राजकुमार जगताप, दीपक मालुसरे, ब्रह्मदेव वाडकर, प्रकाश शिंदे आणि राजेंद्र पाडळे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
        -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !