वाकला येथे SBIF मोफत कॅन्सर तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन

शिबिरामध्ये स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर यासंदर्भात प्राथमिक तपासणी करण्यात आल्या‌.
Cancer Screening and Awareness Camp,chattaarpati Sambhaji Nagar, vaijapur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा ,वैजापूर  (प्रतिनिधी अनिल सुर्यवंशी)

वैजापूर तालुक्यातील वाकला येथे  ग्रामीण भागातील नागरिकांना कॅन्सरविषयी योग्य माहिती मिळावी, कॅन्सरचे लवकर निदान व्हावे आणि गरजेनुसार वेळेत उपचार घेता यावेत, या उद्देशाने वाकला येथे मोफत कॅन्सर जनजागृती, प्राथमिक तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. SBI Foundation अंतर्गत SBIF Cancer Care Project आणि डॉ. माने मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरामध्ये स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर यासंदर्भात प्राथमिक तपासणी करण्यात आली. तसेच कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे, संभाव्य जोखीम घटक, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान संशयास्पद लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना पुढील तपासणी व आवश्यक उपचारांसाठी संदर्भित करण्याबाबतही माहिती देण्यात आली.

शिबिराच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत प्रकल्प समन्वयक रोहित चव्हाण, क्षेत्र कार्य अधिकारी ओम गासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या आरंगळे, डॉ. निकिता आंबेकर, स्टाफ नर्स अश्विनी शिंदे, स्टाफ नर्स प्राची चौधरी, लॅब टेक्निशियन दीपाली वाघमारे, श्री. कैलास खंडागळे (वाहनचालक) तसेच संपूर्ण वैद्यकीय पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

शिबिराच्या प्रारंभी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, आरोग्य उपकेंद्र वाकला येथील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका तसेच आशा सेविका उपस्थित होत्या. ग्रामपंचायत वाकला आणि आरोग्य उपकेंद्र वाकला यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिला व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच आजाराची लक्षणे वेळेत ओळखणे, नियमित तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेणे याबाबत जनजागृती करण्यात आली.

“कॅन्सरला हरविण्यासाठी जागरूकता आणि वेळेवर निदान हाच प्रभावी मार्ग!" हा आरोग्यविषयक संदेश या शिबिरातून ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आला. नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित तपासणी करून घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांच्या वतीने SBI Foundation तसेच डॉ. माने मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, राहुरी (साईधाम फाउंडेशन) यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
        -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !