रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी भीषण दुर्घटना, आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

विनर्स अकॅडमीच्या सहलीदरम्यान घडली दुर्घटना, १६ वर्षांच्या आठ मुलांचा मृत्यूने आळंदी परिसरात शोककळा
8 students drown in the sea, alandi, diveagar, raigadh, raigarh, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, रायगड
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी सायंकाळी एक अतिशय भीषण आणि दुर्दैवी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील 'विनर्स अकॅडमी फॉर 11th अँड 12th'  या खासगी क्लासच्या सहलीदरम्यान समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत पावलेले सर्व विद्यार्थी अवघ्या १६ वर्षांचे असून, या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

४८ जणांची सहल, पोहताना घडला अनर्थ
रायगड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास अकॅडमीचे विद्यार्थी आणि शिक्षक पर्यटनासाठी दिवेआगर समुद्रकिनारी आले होते. या सहलीमध्ये २५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक असे एकूण ४८ जण सहभागी झाले होते. दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवेआगर किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि भरती-ओहोटीचा अचानक अंदाज न आल्यामुळे ८ विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.

स्थानिकांची धावपळ, प्रयत्न निष्फळ
विद्यार्थी पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनारी उपस्थितांमध्ये प्रचंड घबराट आणि धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आणि जीवरक्षकांनी तातडीने मदतीसाठी समुद्रात धाव घेत आठही विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यांना किनाऱ्यावर आणून तातडीने प्रथमोपचार व वैद्यकीय मदत देण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु दुर्दैवाने उपचारापूर्वीच सर्व आठ विद्यार्थ्यांची प्राणज्योत मालवली होती.

पोलीस आणि प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू
घटनेची बातमी मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून, घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. एकाच वेळी आळंदीतील आठ बालकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी पसरताच संपूर्ण आळंदी शहरावर आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !