आता ॲप मध्येच शेतकऱ्यांना पिक पाहणी करण्याचा पर्याय
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (अनिल सूर्यवंशी)
राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी नोंदणीच्या नव्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैजापूर तालुका अध्यक्ष प्रकाश ठुबे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी, वैजापूरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदने देऊन शेतकऱ्यांची बाजू लावून धरली होती.
ई-पीक पाहणीची नोंदणी केवळ तलाठी व कृषी सहाय्यकांमार्फत केल्यास कामात विलंब होऊन शेतकऱ्यांची मोठी अडचण होईल, शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल अॅपद्वारे नोंद करण्याची सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
या मागणीची शासनाने दखल घेतली असून आता ई-पीक पाहणी ॲप मध्ये शेतकरी सहाय्यक असा नवा ऑप्शन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकरी स्वतःही पीक पाहणी नोंदवू शकणार आहेत.
या निर्णयामुळे वैजापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या या पाठपुराव्याबद्दल वैजापूर ते भूमिपुत्र व जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडणारे प्रकाश ठुबे यांचे तालुक्यातील शेतकऱ्याकडून कौतुक होत आहे
ई-पीक पाहणीत शेतकऱ्यांना स्वतः नोंद करण्याचा पर्याय बंद केला होता. याविरोधात तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प्रकाश ठुबे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कृषी मंत्री, कलेक्टर, प्रांत व तहसीलदार यांना निवेदन दिले होते.सदर निवेदनाला तालुक्यातील पत्रकार शेतकरी नागरिक यांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून आता ॲप मध्ये शेतकऱ्यांना पिक पाहणी करण्यासाठी ऑप्शन पुन्हा सुरू झाले आहे!
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
































