सातारा, पुणे आणि सोलापूरच्या हद्दीतून ६ महिन्यांसाठी बाहेर
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्हयातील फलटण शहर आणि परिसरामध्ये सातत्याने शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या १० जणांच्या कुख्यात टोळीला सातारा पोलिसांनी दणका दिला आहे. या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्हयातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुका तसेच सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतून ०६ महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार प्राधिकरणाचे तथा पोलीस अधीक्षक यांनी हे आदेश पारित केले आहेत.
टोळीवर दाखल असलेले गंभीर गुन्हे
फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत सक्रिय असलेल्या या टोळीवर चोरी करणे, जबरी चोरीसह खंडणी मागणे, दुखापत पोहोचवणे आणि बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर वेळोवेळी अटक व प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्या. कायद्याचा धाक न राहिल्यामुळे फलटण तालुका परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.
हद्दपार करण्यात आलेले टोळीप्रमुख व सदस्य
या हद्दपारीच्या कारवाईत खालील टोळीप्रमुख व सदस्यांचा समावेश आहे
टोळी प्रमुख:
तुषार उर्फ गद्या संजय ननवरे (वय २४, रा. मंगळवारपेठ, फलटण)
टोळी सदस्य:
साहिल रवि तारे (वय २४, रा. फलटण)
वैभव बाळासो सस्ते (वय २५, रा. सस्तेवाडी, फलटण)
रोहन उर्फ यल्या नवीन काकडे (वय २४, रा. फलटण)
विनायक बाळासो जाधव (वय २०, रा. ठाकुरकी, फलटण)
राज उर्फ राजु राम बोके (वय ३८, रा. फलटण)
विजय दत्तु ननवरे (वय २७, रा. फलटण)
गायत्री उर्फ प्राची नितीन गाडे (वय १८, रा. कोंडवे, सातारा)
सागर उर्फ टक्या मोहन साळुंखे (वय ३१, रा. वीर, पुरंदर)
राहुल रामचंद्र जगताप (वय २६, रा. फलटण)
कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील इशारा
फलटण शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णा खांबे यांनी या प्रस्तावाची चौकशी केली. त्यानंतर हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासमोर सुनावणी होऊन हद्दपारीचा अंतिम आदेश देण्यात आला.
सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आगामी काळात सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का (MCOCA), आणि एमपीडीए (MPDA) सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई तीव्र केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सदर यशस्वी कारवाईत अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























